Maharashtra Corona Update : राज्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही करोना बाधित रुग्णाचा मृत्यू नाही, 103 नवीन रुग्ण
मुंबई : महाराष्ट्रात कोरोना (Corona Update) परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे.
मुंबई : महाराष्ट्रात कोरोना (Corona Update) परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. राज्यात सध्या 960 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. आज राज्यात 103 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या 48 तासात एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. राज्यात गेल्या 24 तासात 107 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही
राज्यात आज एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,24,982 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के (Recovery Rate) झाले आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7,93,08,018 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78,73,722 (09.93 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्या 960 अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यात सध्या 960 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 300 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 167 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.
देशात कोरोना रुग्णांमध्ये घट
देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. आज देशभरातून कोरोनाचे 1,259 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर एकूण संसर्गित रुग्णांची संख्या आता 4,30,21,982 झाली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 35 रुग्णांच्या मृत्यूनंतर झाला आहे. कोरोनामुळे मृतांची संख्या 5,21,070 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशातील कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Maharashtra Breaking News LIVE Updates : पुणे - कात्रजमध्ये 10 ते 12 गॅस सिलेंडरचे स्फोट
- नारायण राणेंविरोधातील कारवाईत राज्य सरकार नरमलं, 'अधीश' बंगल्यातील बेकायदेशीर बांधकावरून काढलेला आदेश मागे
- Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात
- Ashish Shelar : हिंदूंच्या सणाला परवानगी देताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो का? आशिष शेलारांची खोचक प्रतिक्रिया