(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Breaking News 29 march 2022 Highlights : खासदार नवनीत राणा यांच्या जातवैधता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 18 एप्रिल रोजी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Petrol Diesel Price Today 29 March : भारतीय तेल कंपन्यांनी (IOCL) आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ केली आहे. आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. मंगळवारी देशात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price) कडाडलं आहे. आज पेट्रोलच्या दरांत 50 पैसे प्रति लिटर, तर डिझेलच्या दरांत 55 पैशांची वाढ झाली आहे. आजच्या दरवाढीनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलच्या दरांत प्रति लिटर 84 पैशांची तर डिझेलच्या दरांत 74 पैशांची वाढ झाली आहे. तर दरवाढीनंतर देशाच्या राजधानीत पेट्रोल 100.21 रुपये आणि डिझेल 91.47 रुपयांवर पोहोचलं आहे.
गेल्या 7 दिवसांत तेलाच्या किमतीत झालेली ही सहावी वाढ आहे. तेल कंपन्यांनी 22 मार्चपासून (24 मार्च वगळता) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करणं सुरूच ठेवलं आहे. अशाप्रकारे सात दिवसांत पेट्रोल 4.40 रुपयांनी महागलं आहे. तर डिझेल 4.55 रुपयांनी महागलं आहे.
Russia Ukraine Conflict : नाटोच्या सुरक्षेसाठी अमेरिकेचं मोठं पाऊल, नौदलाची सहा विमानं केली तैनात
Russia Ukraine Conflict : नाटोच्या (NATO) सुरक्षेसाठी अमेरिकेने मोठं पाऊल उचललं आहे. अमेरिकेने नौदलातील सहा विमाने नाटोसाठी तैना त करण्यातचि निर्णय घेतला आहे. यूएस संरक्षण विभाग पेंटागॉनने सांगितले आहे की, नाटो (NATO) म्हणजेच पूर्व युरोपमध्ये नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनची सुरक्षा मजबूत करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक युद्धात तज्ज्ञ असलेली सहा नौदल विमाने तैनात करत आहेत. याशिवाय अमेरिका पूर्व युरोपमध्ये सुमारे 240 नौदल सैनिकांनाही तैनात करणार आहे.
पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले की, वॉशिंग्टन राज्यातील नौदल तळ असलेल्या व्हिडबे बेटावर आधारित EA-18G 'ग्रॉलर' विमान सोमवारी जर्मनीतील स्पॅंगडाहलम विमानतळावर पोहोचेल. हे विमान येथे तैनात असेल. पेंटागॉनच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही विमाने रशिया-युक्रेन युद्धात वापरली जाणार नाहीत.
दिवसभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा आढावा जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
दिवसभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा आढावा जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-marathi-news-breaking-news-live-updates-30-march-2022-today-sunday-marathi-headlines-maharashtra-political-news-mumbai-news-national-politics-news-1045760
गावदेवी पोलीस ठाण्यासमोर भाजपचं ठिय्या आंदोलन
गावदेवी पोलीस ठाण्यासमोर भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांचासह स्थानिकांनी ठिय्या आंदोलन केलं. हे आंदोलन एका तरुणाचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित कार चालकावर कारवाई न केल्याने करण्यात आले.
पार्थ पवार यांच्या नावाचा वापर करून पोलिसांवर टाकण्यात आला दबाव
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या नावाचा वापर करून हिंजवडीच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकण्यात आलाय. गुन्ह्यात खोटी साक्ष आणि चुकीच्या पद्धतीने तपास करावा यासाठी दबाव टाकल्याचे पोलीस अधिकारी नकुल न्यामने यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अश्रफ मर्चंट नावाच्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा प्रकार सोमवारी घडलाय. ही व्यक्ती नेमकी कोण आहे? पार्थ पवारांच्या नावाचा त्याने का वापर केला? हे अटकेनंतर स्पष्ट होणार आहे.
Amravati : खासदार नवनीत राणा यांच्या जातवैधता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 18 एप्रिलला
Amravati : खासदार नवनीत राणा यांच्या जातवैधता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 18 एप्रिलला होणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात वैधता संदर्भातील अंतिम सुनावणी होती.
राऊतांवर बोलण्यात काही पॉइंट नाही: चंद्रकांत पाटील
कधी-कधी मौन हे प्रकृतीसाठी चांगलं असतं आणि मौनातून मनःशांती मिळते, असं ट्विट शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. यावरच बोलताना भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ''सध्या सामना वाचायचं नाही आणि संजय राऊत यांच्यावर बोलायचं नाही असे मी ठरवलंय. एकवेळ सामना वाचण्याचा विचार पुन्हा करू, पण सामनामध्ये सगळे एकांगीच लिहिणाऱ्या राऊतांवर बोलण्यात काही पॉइंट नाही.