(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : राज्यात सोमवारी 6727 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, वर्ध्यात रुग्णसंख्या शुन्यावर
राज्यात आज 101 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के एवढाआहे.
मुंबई : राज्यात मागील दोन दिवस कोरोनाची रुग्णसंख्या काहीशी वाढली होती. मात्र आज राज्यात कालच्या तुलनेत रुग्णसंख्या तीन हजारने कमी झाली आहे. राज्यात आज 6727 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10 हजार 812 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 58 लाख 925 रुणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 95.99 टक्के झाला आहे. सध्या राज्यात 1 लाख 17 हजार 864 अॅक्टिव रुग्ण आहेत.
राज्यात आज 101 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के एवढाआहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,12,08,361 प्रयोगशाळानमुन्यांपैकी 60,43,548 (14.65 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,15,836 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 4,245 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांपैकी यवतमाळमध्ये सर्वात कमी 86 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 17 हजार 42 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे एकूण 35 जिल्हे आणि महापालिका क्षेत्रात एकही मृत्यूची नोंद नाही. तर वर्धा जिल्हात आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही.
एकूण 11 जिल्ह्यातील रुग्णसंख्या 10 च्या खाली
वर्धा - 0
भंडारा - 1
गोंदिया - 4
चंद्रपूर - 7
वाशिम - 7
यवतमाळ - 8
अकोला -8
नांदेड - 5
हिंगोली - 8
नंदूरबार - 5
धुळे - 5
मुंबई आज 608 रुग्णांची नोंद, तर 18 रुग्णांचा मृत्यू
मुंबईत गेल्या 24 तासात 608 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 714 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 6 लाख 94 हजार 796 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 8453 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 728 दिवसांवर गेला आहे.
देशात गेल्या 24 तासात 46148 रुग्णांची नोंद
भारतात गेल्या 24 तासात 46,148 नव्या रुग्णांची नोंद झाली. सलग 21 दिवस 1 लाखापेक्षा कमी दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. भारतात सक्रीय रुग्णसंखेतही सातत्याने घट होत आहे. देशात आज सक्रीय रुग्णसंख्या 5,72,994 इतकी आहे. गेल्या 24 तासात सक्रीय रुग्णसंख्येत एकूण 13,409 इतकी घट झाली असून सध्या देशात केवळ 1.89 टक्के सक्रीय रुग्ण आहेत. कोविड -19 संसर्गातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण बरे होत असल्याने सलग 46 व्या दिवशी भारतात नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गेल्या 24 तासात 58,578 रुग्ण बरे झाले. दैनंदिन नव्या रुग्णांच्या तुलनेत गेल्या 24 तासात जवळपास, 12 हजार (12,430) रुग्ण बरे झाले.