Maharashtra Corona Update : राज्यात आज 2203 नव्या रुग्णांच नोंद तर तीन जणांचा मृत्यू
Coronavirus : राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.99 टक्के इतकं झालं असून मृत्यूदर 1.87 टक्के इतका आहे.
मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या काही अंशी स्थिर असल्याचं चित्र आहे. राज्यात आज 2203 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 2478 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी राज्यात 2138 रुग्णांची भर पडली होती.
राज्यात आतापर्यंत 78,79,766 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 97.99 टक्के झालं आहे. तर राज्यातील कोरोना मृत्यू दर हा 1.84 टक्क्यांवर पोहोचला आहे. राजयात आतापर्यंत 80,41,512 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
राज्यात आज 13,665 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्णांची संख्या असून ती 4454 इतकी आहे. त्यानंतर मुंबईचा क्रमांक लागत असून मुंबईमध्ये 1806 सक्रिय रुग्णसंख्या आहे.
देशातील स्थिती
देशातील एकीकडे कोरोनाचा आलेख वाढत आहे, तर दुसरीकडे मंकीपॉक्स विषाणूचा संसर्गही वाढतोय. गेल्या 24 तासांत देशात 20 हजार 557 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून बुधवारी 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण आधीच्या दिवसाच्या तुलनेत अधिक आहे. आधीच्या दिवशी म्हणजे मंगळवारी 18 हजार 313 कोरोना रुग्णांची नोंद आणि 57 रुग्णांचा मृत्यू झाला होता. देशात बुधवारी दिवसभरात 19 हजार 216 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 46 हजार 323 इतकी झाली आहे. सध्या देशातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.33 टक्के आहे. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.47 टक्के आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Covid-19 : वाढता धोका! देशात 20 हजार 557 नवीन कोरोनाबाधित, 44 रुग्णांचा मृत्यू
- Corona News : वुहान शहरातील हुआनान सीफूड मार्केट हाच कोरोनाचा केंद्रबिंदू, प्राण्यांच्या विक्रीतून कोरोनाचा प्रसार
- Monkeypox : मंकीपॉक्सचे सर्वाधिक रुग्ण समलिंगी संबंध ठेवणारे, WHO ची माहिती, एकपेक्षा जास्त लैंगिक संबंध टाळण्याचा सल्ला