खोकला असेल तर वेळीच उपचार सुरू करावा; राज्य कोविड टास्क फोर्सचा सल्ला
Omicron Updates : खोकला जर जास्त वेळेपर्यंत असेल तर छातीचा एक्स-रे करुन घ्यावा असंही आवाहन कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. वसंत नागवेकर यांनी केलं आहे.
मुंबई : कोणत्याही व्हायरल इन्फेक्शनमुळे तुम्हाला ब्रोंकायटिस होत असतो. श्वसनलिकेच्यावरील आणि खालील भागात लक्षणं दिसण्यास सुरुवात होते. खोकला ओमायक्रॉनमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. ब्रोंकायटिस झाला तर दोन-तीन महिने साधारण खोकला राहतो. अशात यावर उपचार सुरु करावेत असं राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ. वसंत नागवेकर म्हणाले.
डॉ. वसंत नागवेकर म्हणाले की, "टीबीबाबत वेगळी लक्षणे असतात. यात ताप राहणे, भूक न लागणे, वजन कमी होणे, रात्रीच्या वेळी घाम येणे ही सर्व लक्षणे आहेत. त्यामुळे ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये यातील फक्त खोकला हे एकच लक्षण प्रामुख्याने दिसतं. मात्र जर खोकला दोन-तीन आठवडे जात नसेल तर एक्स-रे करुन घ्यावा. त्यामुळे टीबीची लक्षणे पूर्णपणे वेगळी असतात. खोकला हा कोणत्याही वायरल इन्फेक्शन राहत असतो. जर खोकला सतत असेल तर छातीचा एक्स-रे करुन घ्यावा. जर कफ नसेल तर इतर गोष्टी करणं काही गरजेचं नाही."
पोस्ट वायरल कोव्हिड खोकला हा सध्या प्रामुख्याने ब्रोंकायटिसमुळेच येत असल्याचं दिसतंय. आयसीएमआरनं देखील म्हंटलंय की जर दोन-तीन आठवडे खोकला असेल तर चाचणी करा. अशात एक्स-रे एक उपाय आहे असं डॉ.वसंत नागवेकर म्हणाले. कोव्हिडनंतर चांगला व्यायाम, श्वसनाचे व्यायाम करा, चांगला पोषक आहार घ्या असा सल्लाही त्यांनी दिला.
डॉ. वसंत नागवेकर म्हणाले की, "महाराष्ट्रात प्रामुख्याने 80 टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे आहेत तर डेल्टा हा 10 ते 20 टक्के असण्याचा अंदाज आहे. राजस्थानमध्ये 100 टक्के ओमायक्रॉन तर दिल्लीत 90 टक्के ओमायक्रॉन आणि 10 टक्के डेल्टा असण्याचे आकडे आहेत. ज्यांनी बूस्टर घेतलंय त्यांची सिव्हिॲरिटी कमी होतेय. आकडे तरी तेच दाखवत आहेत."
लहान मुलांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती चांगली असते, सोबतच लहान मुलांना मास्क घाला हे सांगणं देखील अतिशय अवघड आहे. त्यामुळे प्रामुख्याने रोग प्रतिकारक शक्ती चांगली असल्याने त्यांनी मास्क नाही घातलं तरी लागण होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Sputnik V : स्पुटनिक व्ही लस ओमायक्रॉन व्हेरियंट विरुद्ध अधिक प्रभावी : रिसर्च
- Coronavirus Cases in India : कोरोनाचा वाढता विळखा, गेल्या 24 तासांत 3 लाख 47 हजार नवे कोरोनाबाधित, 703 जणांचा मृत्यू
- Covid19 Update : ब्रिटनमध्ये कोरोना निर्बंध उठवले; मास्कची सक्ती नाही, वर्क फ्रॉम होमलाही सुट्टी