Coronavirus Cases in India : कोरोनाचा वाढता विळखा, गेल्या 24 तासांत 3 लाख 47 हजार नवे कोरोनाबाधित, 703 जणांचा मृत्यू
Coronavirus Cases in India : गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 3 लाख 47 हजार 254 नवीन रुग्ण आढळले असून 703 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ओमायक्रॉन व्हेरियंटच्या (Omicron) रुग्णांची संख्या 9,692 झाली आहे.
Coronavirus Cases in India : देशात प्राणघातक कोरोना (Corona) व्हायरसच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. यासोबतच कोरोनाचा सर्वात वेगाने पसरणारा प्रकार असलेल्या ओमायक्रॉन प्रकाराच्या (Omicron Variant) रुग्णांमध्येही वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे तीन लाख 47 हजार 254 नवीन रुग्ण आढळले असून 703 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकारांच्या आतापर्यंत 9,692 रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील दैनदिंन रुग्णवाढीचा दर 17.94 टक्के आहे.
सक्रिय प्रकरणांची संख्या 20 लाख 18 हजार 825 वर पोहोचली
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या 20 लाख 18 हजार 825 झाली आहे. त्याचबरोबर कोरोना महामारीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 88 हजार 396 झाली आहे. आकडेवारीनुसार, गुरुवारी दिवसभरात 2 लाख 51 हजार 777 लोक कोरोनोतून बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत 3 कोटी 60 लाख 58 हजार 806 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
आतापर्यंत 160 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत अँटी-कोरोनाव्हायरस लसींचे 160 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. गुरुवारी दिवसभरात 70 लाख 49 हजार 779 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत लसीचे 160 कोटी 43 लाख 70 हजार 484 डोस देण्यात आले आहेत.
देशात आतापर्यंत ओमायक्रॉन प्रकाराच्या 9692 रुग्णांची नोंद
देशात आतापर्यंत 9 हजार 692 लोकांना कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराची लागण झाली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद महाराष्ट्र आणि दिल्लीमधून झाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- पंतप्रधान मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते, जो बायडेन आणि बोरिस जॉन्सन यांना टाकलं मागे
- China Artificial Moon : सूर्यानंतर आता चंद्र देखील मेड इन चायना; चीननं तयार केला कृत्रिम चंद्र
- Pigmentation Remedies : कच्च्या दुधाचा असा करा वापर सुरकुत्या होतील दूर आणि त्वचा होईल मुलायम
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha