Maharashtra Lockdown LIVE Updates: राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 3 वाजता बैठक
Maharashtra Covid 19 Cases LIVE Updates : राज्यात कोरोनाचं संकट वाढत चाललं आहे. काल तर राज्यात एकाच दिवशी 40 हजारांच्या वर कोरोना रुग्ण समोर आले आहेत. राज्यात लॉकडाऊनला पर्याय म्हणून कडक निर्बंधांसह 'मिनी लॉकडाऊन' चा विचार सध्या सरकार दरबारी सुरू आहे.
LIVE
Background
Maharashtra Corona cases Updates: : राज्यात कोरोनाचं संकट वाढत चाललं आहे. काल तर राज्यात एकाच दिवशी 40 हजारांच्या वर कोरोना रुग्ण समोर आले आहेत. कोरोनाचं संकट वाढल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे आज 11 सर्वाधिक कोरोनाबाधित राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत केंद्रीय कॅबिनेट सचिवांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत असताना जनतेत लॉकडाऊनची धास्ती कायम आहे. गेल्या वर्षभराच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यात महाराष्ट्रात कोरोना आकड्यांनि नवा उच्चांक गाठला. जवळपास 6.6 लाख कोरोनाग्रस्त आढळून आले असून तब्बल 400% वाढ फक्त एका महिन्यात नोंद झाली आहे. अशा परिस्थितीत लॉक डाऊन 'टू बी ऑर नॉट टू बी' असा यक्षप्रश्न ठाकरे सरकार समोर उभा टाकला आहे.
मात्र लॉक डाऊन करण्यावरून ठाकरे सरकारमध्येच मतभेद समोर आले आहेत. तर दुसरीकडे आनंद महिंद्रा सारख्या मोठ्या उद्योगपतींपासून ते हातावर पोट असलेल्या गोर गरीब मजुरांपर्यंत अशा सर्व स्तरातून लॉकडाऊनच्या विरोधात सूर आवळलेत. त्यामुळे राज्यात लॉकडाऊनला पर्याय म्हणून कडक निर्बंधांसह 'मिनी लॉकडाऊन' चा विचार सध्या सरकार दरबारी सुरू आहे.
आज मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता
Maharashtra Cabinet Meeting: राज्यात कोरोनाचा प्रकोप झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने राज्यातील अनेक शहरांमध्ये संचारबंदी घालण्यात आली आहे. आज लॉकडाऊन आणि कोरोनाची परिस्थिती यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. आज दुपारी 3 वाजता ही बैठक होणार असून सर्व मंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला उपस्थित असतील अशी माहिती आहे. 2 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या संवादात येत्या दोन दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं. आज मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
दादरमदील गर्दी पाहून पालकमंत्री अस्लम शेख नाराज
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची दादर मंडईला भेट, दादरमदील गर्दी पाहून पालकमंत्री नाराज, असं चित्र असेल तर कठोर निर्णय घ्यावेच लागतील आणि ते आजच घेतले जातील, पालकमंत्र्यांचे संकेत , नाईट कर्फ्यु आधी लावलाय, आता दिवसा सुद्धा कठोर निर्बंध लावाले लागतील, एकच जण 8 वाजता येणार आणि बोलणार असं चालणार नाही, आमचं सरकार सगळेजण एकत्र येतील आणि निर्णय घेतला जाईल , मुंबईत बेडची कमतरता नाही, आयसीयु, ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत, शेख यांची माहिती
राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 3 वाजता बैठक
राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 3 वाजता बैठक, सर्व मंत्र्यांची ऑनलाईन बैठक, लॉकडाऊन आणि कोरोनाची परिस्थिती यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी बोलावली बैठक
आदित्य नारायण आणि पत्नी श्वेता अग्रवाल दोघेही कोरोना पॉझिटिव्ह
प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा गायक मुलगा आदित्य नारायण आणि आदित्यची पत्नी श्वेता अग्रवाल दोघेही कोरोना पॉझिटिव्ह. आदित्यने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली माहिती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मल्टिप्लेक्स मालकांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मल्टिप्लेक्स मालकांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक