Maharashtra Corona LIVE Updates | लोणावळ्यातील एकविरा देवीची उद्या 19 एप्रिल रोजी होणारी चैत्री यात्रा रद्द
Maharashtra Covid 19 Cases LIVE Updates : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यात 15 दिवसांची संचारबंदी लागू केली. परंतु तरीही राज्यात कोरोनाचा प्रकोप थांबायचं नाव घेत नाही. राज्यातील संचारबंदी आणि कोरोना संसर्गासंबंधित सर्व अपडेट्स एकाच क्लिकवर
LIVE
Background
मुंबई : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यात 15 दिवसांची संचारबंदी लागू केली. परंतु तरीही राज्यात कोरोनाचा प्रकोप थांबायचं नाव घेत नाही. खरेदीसाठी नागरिकांची बाजारात गर्दी, ट्रेनमधून प्रवास अशा कारणांमुळे रुग्णांची संख्या आटोक्या येण्याऐवजी ती वाढतच आहे. राज्यात शुक्रवारी (16 एप्रिल) सर्वाधिक 63 हजार 729 रुग्णांचे निदान झाले तर 45,335 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात एकूण 30,04,391 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 81.12 एवढे झाले आहे.
राज्यात काल 398 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युंची नोंद झाली असून राज्यातील मृत्युदर 1.61 एवढा झाला आहे. राज्यात तपासण्यात आलेल्या 2,33,08,878 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 37,03,584 (15.89 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 35,14,181 व्यक्ती होम क्वॉरन्टीन आहेत तर 25,168 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात कालपर्यंत एकूण 6,38,034 ॲक्टिव्ह रुग्ण होते.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात काल 8803 रुग्णांची नोंद झाली. तर ठाणे मंडळात 17,635 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर पुणे मनपा अंतर्गत 5437 नवीन रुग्णांची तर पिंपरी चिंचवड महापालिकेत 2526 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात जिल्ह्यात शुक्रवारी तब्बल दीड हजार लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर सांगली जिल्ह्यात काल दिवसभरात 883 कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार
सोलापूर जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळाला आहे. काल जिल्ह्यात तब्बल दीड हजार लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एका दिवसात तब्बल 1500 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 24 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील 371 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 7 जणांचा मृत्यू झाला असून ग्रामीण भागात 1129 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आणि 17 जणांचा मृत्यू झाला आहे.
होम आयसोलेट असलेले रुग्णच बनत आहेत कोरोनाचे सुपर स्प्रेडर
राज्यातच नाही तर देशात सध्या दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णाचा आकडा वेगाने वाढत आहे. हा आकडा वेगाने वाढण्याचा एक फॅक्टर समोर आलाय तो म्हणजे होम आयसोलेट असलेले रुग्ण. पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्ण किमान 14 दिवस कोणाच्याही संपर्कात यायला नको. असं असतानाही सध्या पॉझिटिव्ह रुग्ण बिनदिक्कतपणे बाहेर फिरत असल्याने तेच कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरत आहेत.
लोणावळ्यातील एकविरा देवीची उद्या 19 एप्रिल रोजी होणारी चैत्री यात्रा रद्द
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील एकविरा देवीची उद्या 19 एप्रिल रोजी होणारी चैत्री यात्रा रद्द. मात्र गडावर रिती रिवाजाप्रमाणे होणार धार्मिक विधी. आई एकविरा देवी ही ठाकरे कुटुंबियांची कुलदेवता तर आगरी आणि कोळी समाजाची कुलस्वामिनी आहे. चैत्र सप्तमीला होणारी यात्रा आणि पालखी मिरवणूक सोहळा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली आहे. या महिन्यात होणारे पुढील काही सोहळे ही रद्द होणार. मंदिर समितीचा निर्णय.
अमरावती जिल्ह्यात आज दिवसभरात 596 कोरोना रुग्णांची नोंद
अमरावती जिल्ह्यात आज दिवसभरात 596 कोरोना रुग्णांची नोंद, आज 22 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू, अमरावती जिल्ह्यातील 14 आणि इतर जिल्ह्यातील 8 जणांचा मृत्यू, जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या पोहचली 56572 वर
राज्यातून ऑक्सिजनच्या तातडीच्या वाहतुकीसाठी रेल्वेची 'ऑक्सिजन एक्सप्रेस' धावणार
ऑक्सिजनच्या तातडीच्या वाहतुकीसाठी रेल्वेची ऑक्सिजन एक्सप्रेस धावणार आहे. उद्या म्हणजेच 19 एप्रिलला कळंबोली स्टेशनवरून विशाखापट्टणमच्या दिशेने हीऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना होणार आहे. दहा टँकर महाराष्ट्रातून जाणार आहेत.
उपचाराविना तडफडून कोरोना रुग्णाचा प्रवासी निवाऱ्यात मृत्यू
चंद्रपूर : उपचाराविना तडफडून कोरोना रुग्णाचा प्रवासी निवाऱ्यात (छोटा बस स्टँड) मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरातील घटना, राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघातील संतापजनक घटना, गोविंदा निकेश्वर (50) असं मृतकाचे नाव, या रुग्णाला काल संध्याकाळी आंभोरा (ता. कुही, जि. नागपूर) येथून उपचारासाठी ब्रम्हपुरी येथे आणले होते, मात्र कुठेच बेड न मिळाल्याने त्या रुग्णाने ख्रिस्तानंद रुग्णालयासमोर असलेल्या प्रवासी निवाऱ्याचा आसरा घेतला आणि तिथेच सकाळी त्याचा उपचाराविना मृत्यू झाला
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गिरगावात कोरोनाचे थैमान
हिंगोली : सध्या सर्वत्रच कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. त्यातच हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गिरगावात कोरोनाचे थैमान पाहायला मिळत आहे. मागच्या एका महिन्यात गिरगावात तब्बल ३५० पेक्षा जास्त रुग्ण आढळले असुन १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या इथले रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० % असुन प्रशासन या गावावर लक्ष ठेवून असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिलीय.