एक्स्प्लोर

Maharashtra Corona Cases | कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र जगात चौथ्या स्थानी

Maharashtra Corona Cases Update | कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र जगात चौथ्या स्थानी पोहोचला आहे. चौथ्या स्थानी रशिया होता तिथे 10 लाख 68 हजार कोरोनाबाधित आहेत, मात्र आता रशियापेक्षा जास्त कोरोनाबाधित महाराष्ट्रात आहेत.

मुंबई : भारतासह जगभरात कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असतानाच, कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र जगात चौथ्या स्थानावर आहे. जगात सर्वाधिक कोरोनाबाधित अमेरिकेत आहेत. त्याखालोखाल भारत दुसऱ्या क्रमांकावर तर ब्राझिल तिसऱ्या क्रमांकावर आहे. काळजीची बाब म्हणजे कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र जगात चौथ्या स्थानी पोहोचला आहे.

खरंतर चौथ्या स्थानी रशिया होता. तिथे 10 लाख 68 हजार कोरोनाबाधित आहेत. मात्र आता रशियापेक्षा जास्त कोरोनाबाधित महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात आता 10 लाख 77 हजार 374 कोरोनाबाधित आहेत. त्यपैकी 7 लाख 55 हजार 850 रुग्ण बरे झाले आहेत, तर 2 लाख 91 हजार 256 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात कोरोनाने 29 हजार 894 बळी घेतले आहेत.

देशभरात आतापर्यंत अबतक 80 हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला असून बाधितांचा आकडा 50 लाखांच्या घरात पोहोचला आहे. देशात मागील 24 तासात 83 हजार 809 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 24 तास 1054 जणांचा मृत्यू झाला. देशात 2 सप्टेंबरपासून दररोजचा कोरोनाबळींचा आकडा एक हजारापेक्षा जास्त आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 79 हजार 292 रुग्ण बरे देखील झाले आहेत.

देशातील कोरोनाबाधितांची संख्या 50 लाखांच्या घरात आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या 49 लाख 30 हजार झाली आहे. त्यापैकी 80 हजार 776 जणांचा मृत्यू झाला आहे. अॅक्टिव रुग्णांची संख्या 9 लाख 90 हजार झाली असून 38 लाख 59 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या सुमारे चार पट अधिक आहे.

मृत्यू दरात घसरण दिलासादायक बाब म्हणजे मृत्यू दर आणि अॅक्टिव रुग्णांच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. मृत्यूदर घसरुन 1.63 टक्के झाला आहे. याशिवाय अॅक्टिव्ह रुग्णा ज्यांच्यावर उपचार सुरु आहेत, त्यांचा दरही कमी होऊन 20 टक्क्यांवर आला आहे. यासोबतच रिकव्हरी रेट म्हणजेच कोरोनामुक्त होण्याचा दर 78 टक्क्यांवर पोहोचला आहे. भारतात रिकव्हरी रेट साततत्याने वाढत आहे.

'या' पाच राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात दोन लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. महाराष्ट्रानंतर दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू, तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली, चौथ्या क्रमांकावर गुजरात आणि पाचव्या स्थानावर पश्चिम बंगाल आहे. या पाच राज्यांमध्ये सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Bhavesh Kaware and Amit Thackeray: भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Census 2027: जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; आजपासून सुरुवात
जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; आजपासून सुरुवात
Yavatmal Ashram School: विद्यार्थीनींच्या स्नानगृहाला ना दरवाजे, ना साध्या लाईटची सोय; 177 विद्यार्थ्यांसाठी अवघे 15 बंक बेड; माजी मंत्र्याच्या आश्रमशाळेतील भयावह वास्तव समोर
विद्यार्थीनींच्या स्नानगृहाला ना दरवाजे, ना साध्या लाईटची सोय; 177 विद्यार्थ्यांसाठी अवघे 15 बंक बेड; माजी मंत्र्याच्या आश्रमशाळेतील भयावह वास्तव समोर

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
Bhavesh Kaware and Amit Thackeray: भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
Embed widget