Maharashtra Corona Update : राज्यात शुक्रवारी 906 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 15 जणांचा मृत्यू
Maharashtra Coronavirus Updates : राज्यात आज 15 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे
मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 906 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 918 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 72 हजार 681 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.65 टक्के आहे.
राज्यात आज 15 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 11 हजार 704 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 99 हजार 309 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1009 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 44 , 89, 471 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत आज 238 रुग्णांची भर तर दोन जणांचा मृत्यू
गेल्या 24 तासात मुंबईत 238 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर दोन रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 272 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शहराचा रिकव्हरी रेट हा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या 2808 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. शहरात आतापर्यंत 7,39,075 रुग्णं कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 2274 दिवसांवर पोहोचला आहे. तसेच शहरातील कोरोना वाढीचा दर हा 0.03 टक्के इतका झाला आहे.
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 11,106 दैनंदिन रुग्णांची नोंद
भारतात एका दिवसांत कोरोनाच्या 11 हजार 106 दैनंदिन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या वाढून बुधवारी तीन कोटी 38 लाख 97 हजार 912 वर पोहोचली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या घटून 1 लाख 26 हजार 620 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनामुळं 459 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे देशात कोरोनामुळे एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा 4,65,082 वर पोहोचला आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातम्या :