(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : कोरोनाचा विळखा सैल, राज्यात सोमवारी 686 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
Coronavirus Today : राज्यात आज 19 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.
मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 686 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 912 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 68 हजार 791 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.64 टक्के आहे.
राज्यात आज 19 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 11 हजार 943 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 99, 859 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1016 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 40 , 52, 219 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
गेल्या 24 तासांत 10 हजार कोरोनाबाधितांची नोंद
भारतात कोरोनाचा कहर अद्याप कमी झालेला नाही. दररोज जवळपास 10 हजार कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 10 हजार 229 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यापैकी केवळ केरळमध्ये 5,848 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 44 लाख 47 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 63 हजार 655 रुग्णांना मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 38 लाख 49 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या जवळपास सव्वा लाख आहे. म्हणजेच, एकूण 1 लाख 34 हजार रुग्ण अद्यापही कोरोनावर उपचार घेत आहेत.
मुंबईत 100 टक्के नागरिकांना कोरोनाचा पहिला डोस
मुंबईत लसीकरणाने ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. मुंबईत कोरोना लसीच्या पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. मुंबईत शुक्रवारपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीच्या पहिल्या डोसचं 99.99 टक्के लसीकरण पूर्ण झाले होते, ते आज 100 टक्के पूर्ण झाले आहे. मुंबईत आतापर्यंत 92 लाख 36 हजार 500 नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. यामध्ये मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका आणि खासगी लसीकरण केंद्रांवरील कामगिरीचाही समावेश आहे. त्यामुळे हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जातोय.