Maharashtra Corona Update : राज्यात आज 889 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 738 रुग्ण कोरोनामुक्त
Maharashtra Coronavirus Updates : राज्यात आज 17 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.
मुंबई : कोरोनाबाधितांच्या (coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 889 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 738 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 80 हजार 799 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.67 टक्के आहे.
राज्यात आज 17 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 8,237 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 87 हजार 522 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1045 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 52 , 56, 850 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
पुण्यात गेल्या 24 तासात 94 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
पुण्यात गेल्या 24 तासात 94 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 104 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 496525 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात दोन कोरनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 845 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 4569 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.
देशात शनिवारी 8,318 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या वृत्तानुसार, मागील 24 तासांत देशात 8 हजार 318 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 465 जणांचा मृत्यू झालाय. याच कालावधीत 10 हजार 967 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 3 कोटी 39 लाख 88 हजार 797 इतकी झाली आहे. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एक लाख 7 हजार 19 इतकी झाली आहे. शुक्रवारी देशात कोरोनाचे 10 हजार 549 नवे रुग्ण आढळले होते. शनिवारी या रुग्णसंख्येत घट पाहायला मिळाली. कोरोनामुळे देशात आतापर्यंत एकूण 4 लाख 67 हजार 933 लोकांचा मृत्यू झालाय. देशात आतापर्यंत 121.06 कोटी जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. देशातील कोरोना रुग्णाचा रिकव्हरी 98.34% इतका झालाय. देशाचा पॉझिटिव्हिटी रेटही घसरलाय. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 0.86% इतका झालाय. मागील 54 दिवसांपासून दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 13 दिवसांपासून एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. देशाचा आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 0.88 टक्के इतका झालाय.
Omicron Variant : भारतासाठी किती धोकादायक आहे "ओमिक्रोन"?
संबंधित बातम्या :