Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना रुग्णवाढीचा आलेख उतरणीला, सोमवारी 28 हजार 286 रुग्णांची नोंद
Maharashtra Corona Update : राज्यात आज 36 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.88 टक्के झाला आहे.
मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 28 हजार 286 नव्या रुग्णांची भर पडली असून 36 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 21 हजार 941 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज 86 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 86 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत 2845 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 1454 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 36 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 36 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.88 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 70 लाख 89 हजार 936 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.09 टक्के आहे. सध्या राज्यात 14 लाख 35 हजार 141 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3402 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 35 लाख 11 हजार 861 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत आज 1 हजार 857 नवे कोरोनाबाधित
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सोमवारी 1 हजार 857 नवे रुग्ण आढळले असून 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 546 झाली आहे. तर मागील 24 तासांत 503 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के इतका आहे. सध्या मुंबईतील 27 इमारती सील करण्यात आल्या आहेत. तसंच आज नव्याने सापडलेल्या 1 हजार 857 रुग्णांपैकी 234 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 37 हजार 742 बेड्सपैकी केवळ 3 हजार 855 बेड वापरात आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
"शीना बोरा जिवंत आहे"; मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचं सीबीआयला पत्र
मुंबई महापालिकेची वाढवलेली प्रभाग संख्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आधारीत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha