Maharashtra Corona Update : कोरोना संसर्गाचा विळखा सैल होतोय; आजची आकडेवारी दिलासादायक
Maharashtra Coronavirus Updates : राज्यात आज 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.
मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 809 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 901 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 52 हजार 486 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.59 टक्के आहे.
राज्यात आज 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 3210 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (10), नंदूरबार (1), धुळे (1), जालना (19), बीज (54), लातूर(84), परभणी (33), हिंगोली (19), नांदेड (21), अकोला (21), अमरावती (17), वाशिम (02), अकोला (17), बुलढाणा (07), नागपूर (66), यवतमाळ (05), वर्धा (6), भंडारा (2), गोंदिया (2), चंद्रपूर (17) गडचिरोली (3) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
राज्यात सध्या 15 हजार 552 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1,60,432व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 933 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 27 , 52, 687 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 267 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 267 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 420 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,33,738 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात चार रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 3689 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1595 दिवसांवर गेला आहे.
देशात कोरोनाच्या 12 हजार 514 नव्या रुग्णांची नोंद
आज 12 हजार 514 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर कोरोना बाधितांची एकूण संख्या वाढून 3 कोटी 42 लाख 85 हजार 814 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रविवार सकाळपर्यंत 251 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढून 4 लाख 58 हजार 437 वर पोहोचला आहे. कोरोनाबाधितांचा दैनंदिन आकडा सलग 24व्या दिवशी 20 हजारांहून कमी आणि सलग 127व्या दिवशी 50 हजारांहून कमी आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख घसरताना दिसत आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 1,172 नवीन रुग्णांची भर पडली आहे तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1,399 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.57 टक्के इतकं झालं आहे तर मृत्यूदर हा 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे.