Maharashtra Corona Update : राज्यात आज 751 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 15 जणांचा मृत्यू
Coronavirus Cases Today : राज्यात आज 15 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.
मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 751 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1555 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 60 हजार 663 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.62 टक्के आहे.
राज्यात आज 15 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 13 हजार 649 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1,38,179 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 865 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 33 , 02, 489 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत आज 210 रुग्णांची भर तर पाच जणांचा मृत्यू
गेल्या 24 तासात मुंबईत 210 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर चार रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 317 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शहराचा रिकव्हरी रेट हा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या 2815 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. शहरात आतापर्यंत 7,36,271 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 2154 दिवसांवर पोहोचला आहे. तसेच शहरातील कोरोना वाढीचा दर हा 0.03 टक्के इतका झाला आहे.
देशात 24 तासांत देशात 11 हजार 451 नवे रुग्ण
देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव अद्याप ओसरलेला नाही. काही ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. शनिवारच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत किंचितशी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. शनिवारी देशात 10 हजार 853 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. मात्र, यामध्ये रविवारी वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात 11 हजार 451 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर 266 जणांचा मृत्यू झालाय. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची देशातील संख्या चार लाख 61 हजार 57 इतकी झाली आहे.
लसीकरण 108 कोटींच्या पार –
कोरोनावर मात करण्यासाठी देशात वेगानं लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. 24 तासांत देशभरात 25 लाखांपेक्षा जास्त लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे देशात 108 कोटी 47 लाख जणांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या डोसची संख्या आहे.