Maharashtra Corona Update : कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढतोय, गुरूवारी 5 हजार 368 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
Maharashtra Coronavirus Updates : राज्यात आज 22 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.
मुंबई : कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे. राज्यात आज तब्बल 5 हजार 368 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1193 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील दोन- तीन दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. आज रुगणसंख्येने पाच हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे. त्यातच नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
राज्यात आज 198 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 198 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 450 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 125 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
मागील पाच दिवसातील रूग्ण संख्या
29 डिसेंबर - 3900 रूग्ण
28 डिसेंबर – 2172 रूग्ण
27 डिसेंबर – 1426 रूग्ण
26 डिसेंबर – 1648 रूग्ण
25 डिसेंबर – 1485 रूग्ण
राज्यात आज 22 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 22 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 18 हजार 217 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 7 हजार 330 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.55 टक्के आहे. सध्या राज्यात 1 लाख 33 हजार 748 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1078 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 88 , 87, 303 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत आज 3 हजार 671 नवे रुग्ण
मुंबईत आज 3 हजार 671 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आज एकाच मृत्यू नाही. याशिवाय, 371 जणांनी कोरोनावर मात केलीय. ज्यामुळे राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7 लाख 49 हजार 159 वर पोहचलीय. दरम्यान, बरे झालेल्या रुग्णांचा दर 96 टक्क्यांवर गेलाय. मुंबईत सध्या 11 हजार 360 रुग्ण सक्रीय आहेत. शहरातील रुग्ण दुप्पटीचा दर 505 दिवसांवर पोहचलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या :