Maharashtra Corona Update : राज्यात आज कोरोनामुळे 19 जणांचा मृत्यू, 699 नवीन रुग्ण
Coronavirus Cases Today in Maharashtra : राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के इतकं झालं आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 6,445 इतकी आहे.
Coronavirus Cases Today in Maharashtra : राज्यात दैनंदिन कोरोना रुग्णांच्या (coronavirus) संख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज 699 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1087 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील 24 तासांत राज्यात 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात आतापर्यंत 64 लाख 88 हजार 680 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के इतकं झालं आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 6,445 इतकी आहे.
राज्यात आज 19 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे. सध्या राज्यात 77 हजार 642 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 896 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकही ओमायक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण आढळला नाही. राज्यातील ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या दहा आहे.
#Maharashtra #COVID19 Updates for today
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) December 7, 2021
*⃣New Cases - 699
*⃣Recoveries - 1,087
*⃣Deaths - 19
*⃣Active Cases - 6,445
*⃣Total Cases till date - 66,39,995
*⃣Total Recoveries till date - 64,88,680
*⃣Total Deaths till date - 1,41,194
*⃣Tests till date - 6,62,55,554
(1/4)🧵
मुंबईत आज 191 नव्या कोरोना रुग्णाची भर -
मुंबई महानगरपालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मुंबईत 191 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झालाय. याच कालावधीत मुंबईत 235 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत 07 लाख 43 हजार 600 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के आहे. मुंबईचा कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 2940 दिवस झालाय. मुंबईत सध्या 1 हजार 668 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत आज 30501 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. तर, मुंबईत आजपर्यंत एकूण 126 लाख 43 हजार 665 नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.