Maharashtra Corona Update : राज्यात आज कोरोना मृतांच्या संख्येत वाढ
Maharashtra Coronavirus Updates : राज्यात आज 41 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.
मुंबई : कोरोनाबाधितांच्या (coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 960 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1043रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 78 हजार 422 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.68 टक्के आहे.
राज्यात आज 41 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 9 हजार 366 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 84 हजार 261 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1084 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 49 , 51, 994 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत आज 258 रुग्णांची भर तर चार जणांचा मृत्यू
गेल्या 24 तासात मुंबईत 258 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर चार जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 287 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शहराचा रिकव्हरी रेट हा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या 2353 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. शहरात आतापर्यंत 7,40,547 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 2353 दिवसांवर पोहोचला आहे. तसेच शहरातील कोरोना वाढीचा दर हा 0.03 टक्के इतका झाला आहे.
पुण्यात गेल्या 24 तासात 95 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
पुण्यात गेल्या 24 तासात 95 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 106 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 496279 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात दोन कोरनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 823 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 4842 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.
देशात दैनंदिन रुग्णसंख्येत कमालीची घट
भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) घटल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच दैनंदिन रुग्णसंख्येतही कमालीची घट पाहायला मिळत आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव घटला असला तरी, धोका मात्र अद्याप टळलेला नाही. देशात गेल्या 24 तासांत 9 हजार 283 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 437 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात एक लाख 11 हजार 481 सक्रिय रुग्ण आहेत. जाणून घेऊया देशाची सध्याची कोरोनास्थिती... केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल दिवसभरात 10 हजार 949 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशातच या व्हायरसमुळे जीव गमावलेल्या रुग्णांची संख्या 4 लाख 66 हजार 584 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 3 कोटी 45 लाख 35 हजार 736 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.