Maharashtra Corona Update : राज्यात आज 999 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 49 जणांचा मृत्यू
Coronavirus Today : राज्यात आज 49 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.
मुंबई : कोरोनाबाधितांच्या (Coronavirus Today) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 999 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1020 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 66 हजार 913 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.64 टक्के आहे.
राज्यात आज 49 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 12 हजार 219 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1,19,432 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1028 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 38 , 63, 284 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत आज 247 रुग्णांची भर तर चार जणांचा मृत्यू
गेल्या 24 तासात मुंबईत 247 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 331 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शहराचा रिकव्हरी रेट हा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या 2816 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. शहरात आतापर्यंत 7,37,671 रुग्णं कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 2819 दिवसांवर पोहोचला आहे. तसेच शहरातील कोरोना वाढीचा दर हा 0.03 टक्के इतका झाला आहे.
देशात 24 तासांत 11 हजार 850 नवीन रुग्ण
देशातील कोरोना महामारीचा (Coronavirus) प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. दैनंदिन रुग्णसंख्यामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 11 हजार 850 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर 555 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. देशातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या एक लाख 36 हजार 36 इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीन कोटी 44 लाख 26 हजार 36 इतकी झाली आहे. तर उपचाराधीन रुग्णांची संख्यामध्ये घट झाली आहे. देशातील एकूण उपचाराधीन रुग्णांची संख्या एक लाख 36 हजार 308 इतकी झाली आहे. कोरोना महामारीमध्ये देशात आतापर्यंत चार लाख 63 हजार 245 जणांचा मृत्यू झालाय.