Maharashtra Corona Update : राज्यात सोमवारी 810 रुग्णांची नोंद तर 1012 रुग्ण कोरोनामुक्त
Corona Update : राज्यात पाच कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला.
मुंबई : राज्यात आज 810 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1012 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
पाच कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू (Maharashtra Corona Death)
राज्यात पाच कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,37, 588 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.03 टक्के इतकं झालं आहे.
राज्यात एकूण 11472 सक्रिय रुग्ण (Maharashtra Corona Active Cases)
राज्यात एकूण 11472 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 4728 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 2586 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्याच 2337 स्वाईन फ्लूच्या रुग्णांची नोंद (Maharashtra Swine Flu Cases)
राज्यात 1 जानेवारी ते 28 ऑगस्ट या कालावधीत 2337 स्वाईन फ्लूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 98 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1 जानेवारीपासून पुण्यात स्वाईन फ्ल्यूबाधित रुग्णांची सर्वाधिक नोंद झाली आहे. पुण्यात 770 रुग्ण आढळले असून 33 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशात 7591 नवे कोरोनाबाधित (Coronavirus Cases Today )
देशात 7,591 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. त्याआधी 09 जून रोजी 7,584 रुग्णांची नोंद झाली होती. जून महिन्यानंतर पहिल्यांदाच नवीन कोरोना रुग्णांची संख्या आठ हजारांच्या खाली गेली आहे. शनिवारच्या तुलनेतही रविवारी कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे. देशात शनिवारी दिवसभरात 9 हजार 436 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. तर रविवारी 7 हजार 591 रुग्ण आढळले. कोरोना रुग्णसंख्येत 1 हजार 845 रुग्णांची घट झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नव्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 9 हजार 206 रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. रविवारी दिवसभरात देशात 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5 लाख 27 हजार 597 वर पोहोचली आहे.