Maharashtra Corona Cases Update: कोरोनाचे आकडे वाढतेच! राज्यात आज 58, 993 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ
Maharashtra Corona Update : राज्यात आज 58993 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज नवीन 45391 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 2695148 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.
Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत असल्याचं चित्र आहे. राज्यात आज 58, 993 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज नवीन 45391 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 2695148 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 534603 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.96% झाले आहे. काल 56 हजार 286 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती.
राज्यात आज 58993 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 45391कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2695148 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 534603 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.96% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 9, 2021
आज राज्यात 301 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळं 57,329 लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. तर राज्यात 5,34,603 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यात 2,16,31,258 एवढ्या टेस्ट झाल्या आहेत.
मर्यादित साठा असूनही लसीकरणात महाराष्ट्राची आघाडी
लसीचा मर्यादित साठा असूनही महाराष्ट्र राज्याने आजपर्यंत 97 लाखांहून अधिक नागरिकांना लसीकरण केले आहे. देशात सर्वाधिक लसीकरण करून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर सातत्य राखून आहे. आज दिवसभरात सुमारे 3 लाख जणांना लस देण्यात आली असून ती अंतिम होईस्तोवर त्याहीपेक्षा जास्त असेल. महाराष्ट्राकडे आज सकाळपर्यंत लसीचे सुमारे 10 लाख डोसेस होते. आज 4.59 लाख डोसेस मिळाले आहेत.