(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : राज्यात आज 4,666 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 3510 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात सध्या 52 हजार 844 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13,503 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबई : राज्यात आज 4,666 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 510 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 63 हजार 416 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के आहे.
राज्यात आज 131 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. तब्बल 42 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 52 हजार 844 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13,503 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (48), नंदूरबार (2), धुळे (20), जालना (33), परभणी (36), हिंगोली (59), नांदेड (32), अकोला (23), वाशिम (6), बुलढाणा (50), यवतमाळ (7), नागपूर (74), वर्धा (5), भंडारा (8), गोंदिया (4), गडचिरोली (32) या 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
जालना, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया या पाच जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 36,59,613 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,56,939 (12.03 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,91,522 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,315 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 345 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 345 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 280 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,22,039 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 3036 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1611 दिवसांवर गेला आहे.
देशातील कोरोनाची सद्यस्थिती
सलग चौथ्या दिवशी देशात 40 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानं सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 45,083 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 460 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच 24 तासांत 35,840 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.