एक्स्प्लोर
महाराष्ट्र काँग्रेसची सर्व लोकसभा मतदारसंघात चाचपणी
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण 15, 16 आणि 17 नोव्हेंबर रोजी प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनमध्ये बैठका घेणार आहेत.

मुंबई : एकीकडे काँग्रेसची राष्ट्रवादीसोबत आघाडीची चर्चा सुरु आहे, तर त्याचवेळी राज्यातील सर्व म्हणजेच 48 लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक काँग्रेसने आयोजित केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान काँग्रेस मतदारसंघनिहाय राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार आहे.
राज्यात भाजपविरोधात सर्व पक्ष एकत्र यावेत, यासाठी प्रयत्न सुरु असताना काँग्रेस सावध भूमिका घेत सर्व जागांचा आढावा घेणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण 15, 16 आणि 17 नोव्हेंबर रोजी प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनमध्ये बैठका घेणार आहेत.
या बैठकांमध्ये राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघनिहाय राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह राज्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
गुरुवार 15 नोव्हेंबर
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र
शुक्रवार 16 नोव्हेंबर
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र
शनिवार 17 नोव्हेंबर
कोकण विभाग
आणखी वाचा
Advertisement
Advertisement



















