Maharashtra Breaking News Live Updates : मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी पार पडणार- सूत्र
Maharashtra Election Results News Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....

Background
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर (Vidhan Sabha Election 2024 Result) नव्या सरकारच्या स्थापनेला वेग आला आहे. महायुतीचे घटकपक्ष मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवण्यासाठी चर्चा करत आहेत. त्यासाठी भाजपासह शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते आतापर्यंत अनेकवेळा दिल्लीत जाऊन आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी जवळजवळ निश्चित झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र एकनाथ शिंदे यांचे जोपर्यंत समाधान होत नाही, तोपर्यंत त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आज राज्याच्या राजकीय पटलावर नेमकं काय घडणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज्यात मुंबई, पणे, नाशिक या प्रमुख शहरांसह इतरही भागात थंडी वाढू लागली आहे. या घटनांचे तसेच राज्यातील इतरही घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर ...
Bhiwandi News भिवंडी मनपा मुख्यालयासमोर वाहनांचा विळखा, वाहतूक पोलीस अॅक्शन मोडवर
भिवंडी महापालिका मुख्यालयासमोर अवैध पार्किंग केल्याने मनपा मुख्यालयाला चारचाकी वाहनांचा विळखा बसला होता. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने माध्यमांनी या अवैध पार्किंगची दखल घेतल्यानंतर खडबडून जागे झालेल्या वाहतूक पोलिसांनी मनपा मुख्यालयासमोर अवैध पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी ऑनलाईन दंड आकारले आहेत. वाहतूक विभागाने केलेल्या या कारवाईमुळे मनपा मुख्यालयासमोर वाहने पार्क करणाऱ्या चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी पार पडणार- सूत्र
मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी पार पडणार
दिल्लीच्या आझाद मैदानात पार पडणार शपथविधी सोहळा
सूत्रांची माहिती























