एक्स्प्लोर

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन  

 Fort Conservation Protest :   छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, या मागणीसाठी आज मुंबईमध्ये आंदोलन सुरु आहे.

मुंबई  : गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी शिवप्रेमींनी आक्रमक पवित्रा (Fort Conservation Protest ) घेतला आहे. राज्यभरातील शिवप्रेमींनी आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. "तुमचा आग्रह होता की मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून भेट द्यावी म्हणून मी तुमच्या भावना जाणून घेण्यासाठी इथे आलो आहे. शिवाजी महाराजांचे गड-किल्ले हा आपला इतिहास आणि आपली परंपरा आहे. तो इतिहास टिकवणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे असे सांगत लवकरच या किल्ल्यांच्या संदर्भात प्राधिकरण महामंडळ स्थापन करून आजपासूनच मी काम करण्याच्या सूचना देत असल्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. 

राज्यातील गडकिल्ल्यांची फार दुरावस्था झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, या मागणीसाठी आज मुंबईमध्ये आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला भेट देत लवकरच गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्राधिकरण महामंडळ स्थापन करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना दिले आहे. "काही किल्ले हे राज्य सरकारच्या अंतर्गत आहेत तर काही किल्ले हे केंद्र सरकारच्या अंतर्गत आहेत. या सगळ्यांची माहिती घेऊन हे किल्ले कसे जतन केले जातील यासंदर्भात लवकरच महामंडळा संदर्भात निर्णय घेतला जाईल. महामंडळ स्थापन केल्यानंतर त्या गडकिल्ल्यांच्या आजूबाजूचा परिसर हा देखील कशा प्रकारे जतन केला जाईल यासाठी देखील काम केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.  

"शिवाजी महाराजांचे गड-किल्ले हा आपला इतिहास आणि आपली परंपरा आहे. त्यामुळे तुमची काही मागणी आहे ती नक्की विचार करण्यासारखी आहे. लवकरच या किल्ल्यांच्या संदर्भात प्राधिकरण महामंडळ स्थापन करून आजपासूनच मी काम करण्याच्या सूचना देत आहे. हे सरकार किती जलद गतीने काम करत आहे हे आता आपल्या लक्षात आले असेल. मी तातडीने या संदर्भात प्रक्रिया करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देत आहे, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.  

दुर्गा मित्रांची नेमणूक करू

"लवकरच दुर्गा मित्र म्हणून आपण नवीन संकल्पना सुरू करणार आहोत. जेणेकरून गड-किल्ल्यांच्या आसपासच्या परिसरातील तरुणांना मदत होईल आणि त्यांना देखील आपण शासनाच्या वतीने मदत करू. त्यामुळे या गडकिल्ल्यांच्या संदर्भात तातडीने काम करण्याच्या सूचना मी संबंधित विभागांना देत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी आंदोलकांना आश्वसान दिले. 

महत्वाच्या बातम्या

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी शिवप्रेमी आक्रमक, मुंबईत राज्यभरातील शिवप्रेमींचं आंदोलन

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget