Maharashtra Chitrarath 2023: प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर साडेतीन शक्तिपीठांच्या देखाव्याचं सादरीकरण; चित्ररथाची पहिली झलक समोर
Maharashtra Chitrarath 2023 : प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर होणाऱ्या संचलनात यंदा राज्यातील ‘साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ यांचं दर्शन होणार आहे.
Maharashtra Chitrarath 2023 : दिल्लीतील यंदाच्या प्रजासत्ताक दिन (Republic Day 2023) संचलनात महाराष्ट्राच्या ‘साडेतीन शक्तिपीठांचा समावेश करण्यात आला आहे. 'साडेतीन शक्तिपीठं आणि स्त्रीशक्ती जागर' या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारण्यात येणार आहे. राजपथावरील परेडसाठी महाराष्ट्राच्या चित्ररथाची (Maharashtra Chitrarath 2023) पहिली झलक एबीपी माझाने दाखवली आहे.
महाराष्ट्राच्या चित्ररथाची पहिली झलक समोर
प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर होणाऱ्या संचलनात यंदा राज्यातील ‘साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ यांचं दर्शन होणार आहे. दिल्लीतल्या रंगशाळा शिबीरामध्ये हा चित्ररथ ठेवण्यात आला आहे. या चित्ररथाची पहिली झलक समोर आली आहे.
प्रजासत्ताक दिनाला महाराष्ट्राचा चित्ररथ कसा असणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता आहे. याची पहिली झलक एबीपी माझाने दाखवली आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठं आणि नारीशक्ती ही यावेळची थीम आहे.
चित्ररथाच्या समोर गोंधळी आहेत. गोंधळींचं जे प्रमुख वाद्य आहे संबळ हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. हे सगळे तुळजाभवानीचे गोंधळी चित्ररथाच्या समोर असतील. त्याच्या मागे साडेतीन शक्तीपीठं म्हणजेच, कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी या साडेतीन शक्तीपीठांचा देखावा दाखवण्यात आला आहे. ही सगळी शक्तीपिठं म्हणजे नारीशक्तीचा सन्मान आहे. पोतराजसुद्धा चित्ररथाच्या मध्यभागी आहेत. एकूणच महाराष्ट्राची लोककला या ठिकाणी सादर केली जाणार आहे.
प्रजासत्ताकदिनी राजपथावर असा असणार महाराष्ट्राचा चित्ररथ
— Prashant Kadam (@_prashantkadam) January 22, 2023
कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी या साडेतीन शक्तीपीठांचा देखावा
समोर देवीचे गोंधळी, आणि चित्ररथावर पोतराज
साडेतीन शक्तीपीठांच्या रूपात नारी शक्तीचा गौरव ही थीम pic.twitter.com/FpjLJxh9RL
या चित्ररथाचे काम नवी दिल्ली येथे युद्धपातळीवर सुरू आहे. नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी व्हावा, यासाठी सतत आग्रही राहून, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी थेट संवाद साधला. यानंतर आपल्या प्रयत्नांना यश आले, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :