एक्स्प्लोर

मंत्रिमंडळ विस्ताराआधी मुख्यमंत्री शिंदे मध्यरात्री नांदेडात संचखड श्री हुजूर साहेबांच्या चरणी; म्हणाले...

Nanded News Update :  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर पावसात मध्यरात्री 1 वाजता सचखंड श्री हुजूर साहेब गुरुद्वाऱ्याचे दर्शन घेतले 

Maharashtra Cabinet Expansion : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांच्या नेतृत्त्वाखालील राज्य सरकारचा अखेर आज सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होणार आहे. विस्ताराच्या आदल्या दिवशी नांदेड-हिंगोली दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोली दौरा आटोपून मध्यरात्री 1 वाजता भर पावसात नांदेड येथील संचखड श्री हजूर साहेब गुरुद्वारा येथे दर्शन घेतलं. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यात कालपासून पाच ते सात वेळेस बदल करण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्री नांदेडात येईपर्यंत त्यांच्या दौऱ्याबाबत निश्चितपणे माहिती समोर येत नव्हती. शेवटी नांदेड येथील सभा, हिंगोली येथील कावड यात्रा, ,सभा आटोपून ते 1 वाजता सचखंड गरुद्वारा चरणी दाखल झाले. यावेळी गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने शीख धर्मियांची मानाची पगडी बांधून आणि तलवार भेट देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल हे उद्या कळेल असे ते म्हणाले.

शिंदे गटाचे समर्थक आमदार त्यांच्या मतदारसंघांमधून मुंबईत दाखल

शिंदे गटाचे समर्थक आमदार त्यांच्या मतदारसंघांमधून मुंबईत दाखल झाले आहेत. तर भाजपचे संभाव्य मंत्रीही मुंबईत दाखल झाले आहेत. भाजप आणि शिंदे गटाचे मिळून एकूण 18 मंत्री आज शपथ घेणार आहेत. शिंदे गटाच्या नऊ तर भाजपच्या 9 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. विशेष म्हणजे भाजपचे आणखी 2 जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यात एक महिला असणार आहे. पण हे दोन जण कोण हे अद्याप समोर आलेलं नाही. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात हालचालीही वाढल्या आहेत. राजभवनातील दरबार हॉल हा राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच मंत्रिमंडळ विस्तार होताच पावसाळी अधिवेशन घेण्याच्याही हालचाली सुरु झाल्या आहेत. येत्या 17 ते 26 ऑगस्ट या कालावधीत पावसाळी अधिवेशन होणार आहे. 

भाजपचे 11 जण शपथ घेण्याची शक्यता

दरम्यान आज मंत्रिपदाची शपथ घेणारे भाजपतील संभाव्य 9 जणांची नावं समोर येत आहे.  पण त्यातही आज भाजपचे 11 जण शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपतील एक महिला आमदार शपथ घेतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्या महिला आमदार कोण? त्याचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. शिवाय 9 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असलं तरी दोन नावांवर चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

महिनाभरापासून मंत्रिमंडळाची प्रतीक्षा

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना आमदारांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री होणं हा मोठा आश्चर्याचा धक्का मानला गेला. शिंदे-फडणवीसांनी शपथ घेऊन 39 दिवस उलटून गेले आहेत. या दिवसांमध्ये राज्यात पावसानं धुमाकूळ घातला. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. दोघांचंच मंत्रिमंडळ असल्यानं शिंदे आणि फडणवीसांनी काही ठिकाणी दौरे देखील केले. मात्र जिल्ह्यांना पालकमंत्री नसल्यानं आणि मंत्रिमंडळ नसल्यानं म्हणावं तसं लक्ष दिलं गेलं नाही, असं म्हणत विरोधकांसह सामान्य जनता देखील सरकारवर टीका करु लागली होती. 

शिंदे गटातून हे आमदार घेऊ शकतात मंत्रिपदाची शपथ
1) उदय सामंत (Uday Sawant)
2) दादा भुसे (Dada Bhuse) 
3) संजय शिरसाट (Sanjay Sirsat)
4) संदीपान भुमरे (sandipan Bhumare)
5) गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)
6) भरत गोगावले (Bharat Gogawale)
7) शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)

भाजपकडून हे आमदार घेऊ शकतात मंत्रिपदाची शपथ

1) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)
2) राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)
3) सुधीर मुनंगटीवार (Sudhir Mungantiwar)
4) गिरीश महाजन (Girish Mahajan)
5) सुरेश खाडे (Suresh Khade)
6) अतुल सावे (Atul Save)
7) मंगल प्रभात लोढा (MangalPrabhat Lodha)
8) रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan)
9) विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
Rohit Sharma, Rarshid Khan : सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : कंगनाची मागणी हास्यास्पद;निकमांवर भाजपचा शिक्का; संजय राऊत काय काय म्हणाले ?ABP Majha Headlines :  11 AM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune NCP Protest : ड्रग्ज प्रकरणाविरोधात पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमकTOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 10 AM :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
Rohit Sharma, Rarshid Khan : सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
Rashid Khan : वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
Vidhan Parishad Election 2024: दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
Maratha Kunbi Records: बोगस कुणबी दाखले रद्द करण्यासाठी हालचाली, हाकेंच्या सहकाऱ्याने अर्ज दाखल केला, कुणबी नोंदीची झाडाझडती होणार
मोठी बातमी: बोगस कुणबी दाखले रद्द करण्यासाठी हालचाली, हाकेंच्या सहकाऱ्याने अर्ज दाखल केला, कुणबी नोंदीची झाडाझडती होणार
Mumbai Accident: मुंबईत कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
Embed widget