एक्स्प्लोर

Maharashtra Budget 2023 : शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ, विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, शिष्यवृत्तीही वाढली; शिक्षण क्षेत्राला काय काय मिळालं?

Maharashtra Budget 2023 : शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमध्येही वाढ करण्यात आली आहे.

Maharashtra Budget 2023 : शिंदे-फडणवीस सरकारनं आपला पहिला अर्थसंकल्प (Budget 2023) आज सादर केला आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जनतेला मोठा दिलासा देण्यात आला आहे. अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सूट, त्याशिवाय मातोश्री रस्ते ग्रामपंचायत योजना, दुष्काळ मिटवण्यासाठी योजना यासह अनेक घोषणांचा पाऊस झाला आहे. प्रत्येक क्षेत्रात भरीव तरतूद करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रासाठीही घोषणांचा पाऊस करण्यात आला आहे. शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमध्येही वाढ करण्यात आली आहे.

शिक्षणसेवकांच्या मानधन वाढ -

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात शिक्षणसेवकांच्या मानधनात सरासरी दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवकांचं मानधन 6000 वरुन 16,000 रुपये करण्यात आले आहे. तर माध्यमिक शिक्षण सेवकांच्या मानधनात 8000 वरुन 18,000 रुपये करण्यात आले आहे. उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांचं मानधन 9000 वरुन 20,000 रुपये करण्यात आले आहे. त्याशिवाय पीएमश्री 816 शाळांना 5 वर्षांत 1534 कोटी रुपये देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. 

शिष्यवृत्तीमध्येही मोठी वाढ - 
यंदाच्या अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना गणवेशही मोफत देण्यात येईल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 5 ते 7 वी च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती 1000 वरुन 5000 रुपये करण्यात आले आहे. 8 ते 10 वी च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती 1500 वरुन 7500 रुपये इतकी करण्यात आली आहे. त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देण्यात येईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली आहे. 

विद्यापीठे/ शैक्षणिक संस्थांना 500 कोटी रुपये अनुदान
 
- डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, पुणे
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर
- शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती
- कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे
- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर
- डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ
- मुंबई विद्यापीठ
- लक्ष्मी नारायण इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूर या संस्थेला अभिमत विद्यापिठाचा दर्जा देऊन
- वरील सर्व संस्थांना 500 कोटी रूपये विशेष अनुदान
- महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूरला इमारत बांधकामासाठी निधी देणार

राज्यात 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे
 
- राज्यात 14 ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे करणार
- सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, अंबरनाथ (ठाणे)
- मानसिक अस्वास्थ आणि व्यसनाधीनतेची वाढती समस्या पाहता जालना, भिवंडी, पुणे, नागपूर येथे नवीन व्यसनमुक्ती केंद्रे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget