एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Maharashtra budget : जनतेवर अन्याय लादणारा अर्थसंकल्प, राजन क्षीरसागरांची टीका, जनता रस्त्यावर उतरणार 

शिंदे-फडणवीस सरकारनं मांडलेला अर्थसंकल्प हा जनतेवर अन्याय लादणारा असल्याचे मत महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सरचिटणीस कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी व्यक्त केलं आहे.

Maharashtra budget 2023: शिंदे-फडणवीस सरकारनं मांडलेला अर्थसंकल्प (Budget) हे पंचामृत असल्याचा दावा केला आहे. मात्र, यामधील मध आणि तुपाचे वाटेकरी कंत्राटदार, भांडवलदार आहेत. केवळ गोमुत्र शेतकरी कामगारांच्या वाट्याला दिले असल्याची जळजळीत टीका महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सरचिटणीस कॉम्रेड राजन क्षीरसागर (Rajan Kshirsagar) यांनी केली आहे. हे बजेट जनतेवर अन्याय लादणारे आणि संताप वाढवणारे आहे. या बजेटच्या तरतुदीविरुद्ध जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नसल्याचे क्षीरसागर म्हणाले. 

महाराष्ट्रात कालव्यांची दुर्दशा, धरणे भरलेली असून पाणी नाही

पायाभूत सुविधांच्या नावाखाली मेट्रोसाठी 39 हजार कोटी समृद्धी, हायब्रीड अन्युएटी रस्त्यासाठी हजारो कोटी आणि सिंचन व्यवस्थापन, कालवेदुरुस्ती यासाठी मात्र नकारघंटा. सर्वात जास्त धरणे असलेल्या महाराष्ट्रात आज कालव्यांची दुर्दशा असल्यानं शेतकऱ्यांना धरणे भरलेली असून देखील पाणी मिळत नाही. या राष्ट्रीय उत्पन्नात भर टाकणाऱ्या विकासाच्या पायाभूत सुविधा आहेत. सिंचनाच्या पायाभूत सुविधासाठी रास्त तरतूद करण्याऐवजी या धरणातील पाणी उद्योग व शहरे यांच्याकडे वळवण्याचा घाट घातला जात आहे. मराठवाड्याच्या पाणी पुरवठ्यासाठी केलेली 20 हजार कोटी रुपयांची तरतूद ही देखील केवळ WaterGrid मधील कंत्राटदारांना लाभ देण्याचीच योजना आहे. मराठवाडा तहानलेलाच राहणार असल्याचे राजन क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.  

बजेट घोषित करण्यापूर्वीच महाराष्ट्र सरकारनं 67 हजार कोटी रुपयांची सुमारे 41 टक्क्यांपर्यंत वीज दरवाढ लादली जात आहे. यातच मराठवाडा आणि विदर्भ येथील 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामधील जनतेचे रेशन कपात करुन केवळ 150 रुपये रोख अनुदान देण्याचा निर्णय अन्याय लादणारा आहे. महाराष्ट्र शासन पायाभूत सुविधासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अनेकदा फुकट आणि कवडीमोल भावाने संपादित करत आहे. भूसंपादन कायदा 2013 च्या तरतुदी धाब्यावर बसवून अनैतिक व्यवहार शिंदे-फडणवीस सरकार राबवीत आहे. जनतेला नैसर्गिक आपत्तीत मदत देण्याबाबत सरकार दिशाहीन आहे. यंदाच्या वर्षी हंगाम उलटून गेल्यानंतर देखील अनेक शेतकऱ्यांना ना पीक मिळाला ना विमा भरपाई मिळाल्याचे क्षीरसागर म्हणाले.

महत्वाच्या समस्यांकडं डोळेझाक

कांदा उत्पादक शेतकरी उध्वस्त झाला आहे. कापूस उत्पादकांची होरपळ आणि सोयाबीन, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचा जीव टांगणीला आहे. अशात राज्य शासनाने शेतीमाल खरेदी प्रक्रियेतून संपूर्णतः अंग काढून घेतले आहे. उलट शेतकऱ्यांची टिंगल-टवाळी चालवली आहे. तांदूळ  खरेदीबाबत सरकारनं केलेली घोषणा संपूर्ण फसवी असून, गेली तीन वर्षे कोणताही राज्य शासनाचा बोनस दिला नसल्याचे क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. 10 लाख घरांच्या घोषणांचे नेहमीच गाजर आहे. ना शहरी जनतेला ना ग्रामीण जनतेला घरकुल योजनेचा पुरेसा लाभ दिला. आरोग्य व्यवस्था संपूर्णतः खाजगीकरणाकडे ढकलली जात आहे. नाव सरकारी दवाखान्याचे आणि सेवा मात्र खासगी यातच 108 Ambulance सेवेसाठी दिलेले कंत्राट म्हणजे भ्रष्टाचाराचा अजब नमुना असल्याचे क्षीरसागर म्हणाले. 

बजेट जनतेवर अन्याय लादणारे

शिक्षण व्यवस्थेत कोविड काळात शाळा कॉलेजात न जाता देखील फीस वसुली करणाऱ्या संस्थाचालकांना वरदहस्त आहे. याच बरोबर खाजगी परकीय विद्यापीठांना मुक्त वाव देत सामाजिक न्यायला देखील तिलांजली दिली आहे. बेरोजागरीवर मात करण्याच्या योजना याबद्दल रिक्त पदे भरण्यासाठी कोणतेही ठोस उपाय नाहीत. एवढेच नाही तर न्यायालयाने खोट्या जात प्रमाणपत्रावर बळकावलेल्या रद्द केल्याबद्दल देखील उपेक्षित घटकांना न्याय दिला नाही. 

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Budget 2023 : अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस, महसुली तूट 16 हजार कोटींवर; असा रुपया येणार आणि असा खर्च होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : Maharashtra News Update : 11 PM : 06 June 2024 : एबीपी माझा हेडलाईन्सNavneet Rana on Lok Sabha : पराभवानंतर नवनीत राणा पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर, म्हणाल्या...जय श्री राम!Devendra Fadnavis Delhi : राजीनामा देण्याच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस ठाम, दिल्लीत काय होणार?Devendra Fadnavis Special Report : राजीनाम्याचं केंद्र, काय ठरवणार देवेंद्र? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
Bhiwandi : भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
Embed widget