Maharashtra Breaking News LIVE: राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा; एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News Live Updates: राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...

Background
Maharashtra Breaking News Live Updates: राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. तर चीनमध्ये कोविड-19 साथीच्या आजारानंतर पाच वर्षांनी एक नवीन आरोग्य संकट उद्भवले आहे. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलं आहे. बीडचे मस्साजोग येथील सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
वंजारी समाजाची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा! ठाण्यात वंजारी समाजाकडून निदर्शनं
ठाणे : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे आणि वंजारी समाजाला टार्गेट करून समाजाची बदनामी करणाऱ्या मनोज जरांगे आणि अंजली दमानिया यांच्यावर कारवाई करण्याची मागणी वंजारी समाजाने ठाण्यात केली आहे.
ठाणे आणि मुंबई परिसरातील वंजारी समाजाने आज ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहाबाहेर निदर्शनं केली. यावेळी मनोज जरांगे आणि अंजली दमानिया यांच्याविरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली. जरांगे म्हणतात धनंजय मुंडे आणि वंजारी समाजाला घरात घुसून मारू, अंजली दमानिया म्हणतात वंजारी समाजाला नोकऱ्या कशा लागल्या? अशी वक्तव्य करून समाजाला टार्गेट करणाऱ्या आणि समाजाची बदनामी करणाऱ्या लोकांचा आम्ही निषेध करत असल्याचं म्हणत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वंजारी समाजाने केली. याबाबतचं निवेदन ठाणे पोलिसांना देण्यात आलं.