Maharashtra Breaking News Live Updates : नागपूरच्या गांधीबाग परिसरात एकाची हत्या, एक जण गंभीर जखमी
Maharashtra Breaking News Live Updates: राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...

Background
मुंबई : राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलेच गाजले आहे. या प्रकरणात आता रोज नवनवीन माहिती समोर येत आहेत. सीआयडीने या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी तपास चालू केला आहे. या तपासात यंत्रणेच्या हाती बऱ्याच गोष्टी लागत आहेत. दुसरीकडे राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. राज्यात सर्वदूर शेकोट्या पेटत आहेत. या प्रमुख तसेच राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...
बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार वेगवेगळी आंदोलनं, उपोषणं सुरु
बीड जिल्हाधिकारी कार्यालय समोर चार वेगवेगळे आंदोलनं, उपोषणं सुरु आहेत.
आज वाल्मीक कराड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या यासाठी देखील एका महिलेने आंदोलन सुरू केलय.
3 दिवसांपासून सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी उपोषण केले जातेय.
तिसरे आंदोलन शहरातील शस्त्र परवाने तपासून रद्द करण्यासाठी अंजली दमानिया आंदोलन करत आहेत.
वाढत्या प्रदूषणाच्या उपाययोजनेसाठीमुंबई महापालिका आयुक्त आणि प्रदुषण नियंत्रण विभागाची शुक्रवारी बैठक
वाढत्या प्रदूषणाच्या उपाययोजनेसाठी शुक्रवारी बैठक
मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रदुषण नियंत्रण विभागाची बैठक
प्रदुषण रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या गाईडलाईनच्या अंमलबजावणी संदर्भात होणार आढावा
वाढतं बांधकाम, बेकरी पदार्थ, धुळ, ज्वलनशील पदार्थ यामुळे प्रदुषणाचा धोका वाढला
























