Maharashtra Breaking News LIVE Updates : राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News LIVE Updates : जगभरातील तसेच देश आणि राज्यातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ...

Background
Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यात सध्या राजकीय क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडत आहेत. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सडकून टीका करताना दिसतात. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सरकार अडचणीत सापडले आहे. मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पुणे या शहरांतील बलात्कार प्रकरणांमुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करत आहेत. लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या मुद्द्यावरूही सरकार टीकेचे धनी बनत आहे, या प्रमुख तसेच इतरही महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
मध्य नागपूरचे माजी आमदार डॅा. यशवंत बाजीराव यांचे निधन
मध्य नागपुर चे माजी आमदार डॅा. यशवंत बाजीराव यांचे निधन झाले आहे...
ते अखिल भारतीय आदिवासी हलबा विकास परिषद चे संस्थापक अध्यक्ष होते. ते विदर्भाचे कबड्डी टीमचे कॅप्टन होते तर पहेलवान म्हणून राष्ट्रीय स्तरावर त्यांनी कुस्ती खेळली होती.
सोलापुरात ठाकरेंच्याशिवसेनेले धक्का, हकालपट्टी केलेला माजी मंत्री शिंदेंच्या शिवसेनेत
सोलापुरात ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का बसलाय. दोन दिवसापूर्वी ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांसाह माजी मंत्र्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. आता या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय.























