Maharashtra News Live Updates: संवर्धनाचे काम सुरु असलेल्या विठ्ठल मंदिरात अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी झिरपू लागले पाणी , प्रशासनाचा खुलासा
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील राजकीय, क्रीडा, गुन्हेगारी जगतातील ताज्या घडामोडी आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर"

Background
Maharashtra News LIVE Updates : मुंबई, पुण्यासह मान्सून राज्यात दाखल झाला आहे. रविवारी संध्याकाळी मुंबईत विविध ठिकाणी संध्याकाळपासून पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. तर राज्यातील विविध भागात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर, काही ठिकाणी रिमझिम पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याचं पाहायला मिळत आहे. या सर्व घडामोडींसह इतरही महत्त्वाच्या घटनांची संपूर्ण माहिती मिळवा एका क्लिकवर...
Pandharpur : संवर्धनाचे काम सुरु असलेल्या विठ्ठल मंदिरात अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी झिरपू लागले पाणी , प्रशासनाचा खुलासा
Buldhana : मलकापूर शहरात घाणीचं साम्राज्य, पावसाळा आला तरी नालेसफाई नाही.
Buldhana : मलकापूर शहरात घाणीचं साम्राज्य, पावसाळा आला तरी नाले सफाई नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून नगर परिषदेसमोर निदर्शने.
बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर हे मोठे शहर आहे. मात्र पावसाळा आला तरीही नगरपरिषद प्रशासनाने शहरातील नालेसफाई केली नाही
त्यामुळे संपूर्ण शहरात दुर्गंधी पसरत असून मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी कचरा ही साचलेला आहे
वेळोवेळी नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देऊनही नगरपरिषद साफसफाई करत नसल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने मलकापूर नगर परिषदेसमोर घोषणाबाजी करत निदर्शने केली व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले.























