Maharashtra Breaking 9th July LIVE Updates: दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघावर भाजपचा डोळा
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

Background
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
1. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला मुसळधार पावसाचा इशारा, गरजेच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका, प्रशासनाचं आवाहन
2. मुंबईत रेल्वे, रस्ते वाहतूक तूर्तास सुरळीत, मध्य आणि हार्बर रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिराने, पश्चिम रेल्वेही वेळेवर, रस्ते वाहतूक विनाअडथळा
3. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुण्यात आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळाही राहणार बंद.. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रशासन सतर्क
4. नागपूरमध्ये 24 तासांच्या आत हिट अॅण्ड रनच्या दोन घटना, गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारच्या धडकेत एकाचा मृत्यू, तर दुसऱ्या अपघातात मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणाला कारनं उडवलं
5. वरळी हिट अॅड रन प्रकरणात आरोपी मिहिरला पळून जाण्याचा वडीलांचा सल्ला, तर मिहीर चालवत असलेली गाडी लपवण्याचा आरोपींचा डाव, पोलीस तपासात माहिती समोर
Pune News : पुण्याच्या राजकरणातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे वसंत तात्या मोरे
Pune News : पुण्याच्या राजकरणातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे वसंत तात्या मोरे. त्यानी आज शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. मातोश्री येथे हाती शिवबंधन बांधून उद्भव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. या वेळी आपल्यावर पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडणार आहे, विधानसभा लढण्यास सांगितले तर लढू, नाहीतर नगरसेवक निवडणूक लढवूच, पुण्याची गुन्हेगारी वर ही काम करणार अशी प्रतिक्रिया या वेळी वसंत मोरे यांनी दिली.
























