Maharashtra News Live Updates : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झारखंडमधे आयकर विभागाची छापेमारी
Maharashtra News Live Updates : राज्यातील तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Background
मुंबई : राज्य सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. प्रत्येक पक्ष तसेच प्रत्येक पक्षाचा उमेदवार जीव तोडून प्रचार करत आहेत. या प्रचारादरम्यान, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळतायत. एका नेत्याने केलेल्या टीकेला तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तर दिले जात आहे. दुसरीकडे मतदारांना आकर्षित करण्यासाठी भरभरून आश्वासनं दिली जात आहे. राज्यातील प्रमुख नेते एका दिवशी चार-चार सभांना संबोधित करताना पाहायला मिळतायत. राज्यातील या घडामोडींसह देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेट्स वाचा एका क्लिकवर....
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक आणि खासगी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर ट्रक व खाजगी बस चा अपघात होऊन 26 प्रवासी जखमी.
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गा वरील पुणे मुंबई लेन वरील खोपोली हद्दीत बोरघाट उतराना नवीन बोगद्या मध्ये क्रमांक KA 56 5675 ट्रकच्या ब्रेकची हवा उतरल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला अर्थात तिसऱ्या लेनवर उभा केला असताना पाठीमागून येणारी बाळूमामा कंपनीची खाजगी बस क्र.MH 03 DV 2412 वरील चालकाला अचानक ट्रक समोर दिसल्याने त्याचे नियंत्रण सुटून ट्रकला मागून जोरदार धडक दिली.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झारखंडमधे आयकर विभागाची छापेमारी
झारखंड -
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झारखंडमधे आयकर विभागाची छापेमारी
रांची आणि जमशेदपूरमधे ७ ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी सुरू
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या खासगी साचिवाच्या घरावर छापेमारी
सोरेन यांचे खासगी सचिव सुनील श्रीवास्तव यांच्या घरावर छापेमारी
घरातून काही कागदपत्र ताब्यात घेतल्याची माहिती
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून काही केस संदर्भात चौकशी सुरु
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छापेमारी सुरू असल्याने राजकारण तापण्याची शक्यता























