Maharashtra Breaking News Live Updates : साताऱ्यातील शेंद्रे येथे 1 कोटी रुपयांची रोकड जप्त
Maharashtra News Live Updates : राज्यातील तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Background
मुंबई : राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 4 नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची मुदत आता संपली आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच मतदारसंघांत कोणा-कोणामध्ये लढत होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. आता राज्यभरात मोठ्या ताकदीने प्रचाराला सुरुवात होणार आहे. आज राज्यातील अनेक नेते प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. बड्या नेत्यांच्या आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभा होणार आहेत. त्यामुळे आज राज्याच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींचे तसेच इतरही महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर....
अभिनेता सलमान खानल लाॅरेन्स बिष्णोईच्या नावाने देण्यात आलेल्या धमकीचा मेसेज कर्नाटकातून
अभिनेता सलमान खानल लाॅरेन्स बिष्णोईच्या नावाने देण्यात आलेल्या धमकीचा मेसेज कर्नाटकातून करण्यात आल्याचे निष्पन्न
मुंबई पोलिसांची टिम आरोपीला पकडण्यासाठी कर्नाटकसाठी रवाना
काल मध्य रात्री अज्ञात व्यक्तीने मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मेसेज करत धमकावले होते
पुण्यातील स्वारगेट चौकामध्ये महिलेची छेड काढणाऱ्या इसमाला तरुणांकडून बेदम मारहाण
महिलेची छेड काढणाऱ्या इसमाला तरुणांकडून बेदम मारहाण
पुण्यातील स्वारगेट चौकामध्ये करण्यात आली मारहाण
सदर इसम महिलेची मंडई पासून स्वारगेटपर्यंत करत होता पाठलाग
गाडीवरून पाठलाग करत असताना पैसे देतो गाडीवर बस असेदेखील म्हणाला असल्याचा आरोप
तरुणाने मारहाण करत स्वारगेट पोलिसांच्या केलं इसमाला स्वाधीन
स्वारगेट पोलिसांनी केला आहे गुन्हा दाखल
अधिक तपास पोलीस करत आहेत























