Maharashtra Breaking Updates LIVE : देश-विदेशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
Breaking News Live Updates : महाराष्ट्र, देश-विदेशातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Background
Breaking News Live Updates : राज्यभरात पावसाच्या सरी बसरत आहेत. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत पावसाने थैमान घातले आहे. काही ठिकाणी तर ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. या पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. या घटनांसह राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
Rahul Gandhi on Maharashtra Visit : राहुल गांधी महाराष्ट्र उद्या दौऱ्यावर; दिल्लीवरून ते थेट नांदेड गाठणार
Rahul Gandhi on Maharashtra Visit : राहुल गांधी महाराष्ट्र उद्या दौऱ्यावर
उद्या 5 सप्टेंबर सकाळी दिल्लीवरून ते थेट नांदेड येथे जाणार आहेत
नांदेड येथे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतील
नांदेड येथून ते थेट कोल्हापूरला विमानाने जातील
कोल्हापूर येथून हेलिकॉप्टर द्वारे सांगली जिल्ह्यातील कडेगांव येथे दिवंगत शिक्षण महर्षी माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमात उपस्थित राहतील
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे देखील दौऱ्यात सोबत राहणार आहेत
Wardha News : वर्ध्यात ST च्या संपाचा पाहिजे तितका परिणाम नाही
Wardha News : वर्ध्यात एसटीच्या संपाचा परिणाम फारसा जाणवत नसल्याचे चित्र सध्या वर्ध्याच्या बस स्थानकावर आहे. वर्धा अगरातून अनेक गाड्या विविध गावांसाठी सुटल्या आहे. येथे बसगाड्या सुरू असल्याने सकाळच्या सुमारास प्रवस्याना देखील अडचणींचा सामना करावा लागला नाहीए. त्यामुळे वर्ध्यात एस टी च्या संपाचा फारसा परिणाम दिसून आला नाही. तुरळक बसेस बंद असल्याचं दिसून आले.























