Maharashtra Breaking News Live Updates : पूर्व नागपूर जागेचा तिढा सुटला, संगीता तलमले यांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे
Maharashtra News Live Updates : राज्यातील तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
LIVE
Background
मुंबई : राज्यात सध्या सगळीकडे विधानसभा निवडणुकीचीच (Vidhan Sabha Election 2024) चर्चा आहे. या निवडणुकीत विजयी कामगिरी करण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. मात्र बंडखोर नेत्यांमुळे या पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. बंडखोर नेत्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, यासाठी सर्वच पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज कोणता नेता आपला अर्ज मागे घेणार? आणि कोणता नेते आपल्या भूमिकेवर ठाम राहणार? हे स्पष्ट होणार आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्याचा वाचा एका क्लिकवर...
मोठी बातमी! मधुरिमाराजे यांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये आणखी एक ट्विस्ट
काँग्रेसच्या मधुरिमाराजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला
Geeta Jain : गीता जैन उमेदवारीवर ठाम, निवडणुकीला सामोरे जाणार
उमेदवारीवर मी ठाम आहे, निवडणुकीला सामोरे जाणार
लोकांचा आग्रह आहे नाही तर पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा रावण जागा होईल, त्यामुळे शहराला त्यांच्या अत्याचारापासून वाचवायचं आहे तर तुम्ही पाहिजे असा लोकांचा आग्रह आहे
महायुतीला माहिती आहे मी अपक्ष आहे, त्यांना ही कुठे गिल्टी फील होत असेल ५ वर्ष मदत घेतली आणि असं सर्व होतंय
मुख्यमंत्र्यांना आश्वासन दिलं होतं, उमेदवार तुमचा आणि चिन्ह आमचं, मात्र तसं झालं नाही त्यामुळे मुख्यमंत्री देखील दुखावले आहेत
लोकांना विरोधक समजवण्याचा प्रयत्न करत आहेत बटोगे कटोगे वगैरे
मात्र जनतेला माहिती आहे पुढे काय करायचं
रिंगणात उतरल्यावर जिंकण्याचा विश्वास असतो, लोकांकडे बघितल्यावर वाटतं मीच जिंकेन
नरेंद्र मेहतांवर एफआयआर झाली आहे, फक्त मी आरोप लावले नाही आहे
बलात्कार, भ्रष्टाचार सारखे आरोप त्यांच्यावर आहे
सगळ्यांना वाटते की पार्टीनं चूक केलीय त्यांना उमेदवारी देऊन आणि तीच चूक सुधरायला आम्ही इथे आहोत
मुख्यमंत्र्यांना वाटतंय की त्यांच्याबरोबर धोका झाला, उमेदवार तुमचा निशाणी आमची असं ठरलं होतं पण तसं नाही झालं
आज निशाणी भेटणार त्यानंतर आमचा देखील प्रचार वेगानं सुरु होणार
पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते व अपक्ष उमेदवार तानाजी वनवे यांचा उमेदवारी अर्ज मागे
पूर्व नागपूर काँग्रेस बंडखोरी अपडेट
पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते व अपक्ष उमेदवार तानाजी वनवे यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली आहे...
पूर्व नागपूर मतदार संघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे गेल्या नंतर नाराज होऊन तानाजी वनवे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता.. मात्र पक्षश्रेष्ठींच्या निर्देशानंतर आज त्यांनी त्यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे...
Jayadatta Kshirsagar : जयदत्त क्षीरसागर यांची बीड विधानसभा निवडणुकीतून माघार
जयदत्त क्षीरसागर यांची बीड विधानसभा निवडणुकीतून माघार..
जयदत्त क्षीरसागर यांची निवडणुकीतून माघार
अपक्ष उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता बीड विधानसभा निवडणुकीमध्ये संदीप क्षीरसागर विरुद्ध योगेश क्षीरसागर या चुलत भावामध्ये संघर्ष होणार आहे..
मध्य नागपूर मतदारसंघातून भाजप पदाधिकारी किशोर समुद्रे यांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे
मध्य नागपूर मतदारसंघातून भाजप पदाधिकारी किशोर समुद्रे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे...
मध्य नागपूर मधून भाजप ने प्रवीण दटके यांना उमेदवारी दिली असून किशोर समुद्रे यांची बंडखोरी दटके साठी अडचणीची होती...
अखेरीस किशोर समुद्रेने पक्ष नेत्यांचा ऐकून त्यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे...