Maharashtra Breaking 26th June LIVE Updates: आवाजी मतदानानं ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

Background
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
1. देशाच्या इतिहासात प्रथमच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक, आज सकाळी 11 वाजता मतदान, भाजपचे ओम बिर्ला आणि काँग्रेसच्या के सुरेश यांच्यात चुरस
2. राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते असणार, काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांची घोषणा
Rohit Pawar on Nashik Teacher Poll: नाशिक विभागाच्या शिक्षक मतदार संघासाठी आज मतदान, रोहित पवार म्हणाले...
Rohit Pawar on Nashik Teacher Poll: नाशिक विभागाच्या शिक्षक मतदार संघासाठी आज मतदान पार पडत आहे, याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडीच्याच उमेदवाराचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केलाय. महायुतीचा विचार केला, तर कोण कोणत्या पक्षाचाआहे आणि कोण कुणाचा उमेदवार आहे हेच कळायला मार्ग नाही असा टोला रोहित पवार यांनी लगावला. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या वेळी साड्या आणि नथ वाटपाचे आरोप झाले. यावरून रोहित पवार यांनी महायुतीवर निशाणा साधत, त्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी लोकसभा निवडणुकीत देखील पैशाचा वापर केला. तसाच वापर आत्ता देखील शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी केला जातोय. मात्र मतदार हा सुज्ञ असून , लोकसभा निवडणुकीत पैशाचा वापर करणाऱ्या आणि दमदाटी करणाऱ्या उमेदवारांना लोकांनी बाजूला सरलं तशाच पद्धतीने याही निवडणुकीत होईल असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.
Parliament Session: लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी NDA कडून ओम बिर्ला रिंगणात, तर काँग्रेसकडून के. सुरेश रिंगणात
Parliament Session: लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होणार आहे. लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना देण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी धुडकावून लावली. त्यामुळे इंडिया आघाडीनं अध्यक्षपदासाठी उमेदवार दिलाय. त्यानुसार काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार के. सुरेश यांनी अर्ज भरलाय. भाजपकडून ओम बिर्ला यांनाच पुन्हा संधी देण्यात आलीय. ओम बिर्लाच्या समर्थनार्थ 13 पक्षांनी प्रस्ताव सादर केलाय. पीएम मोदी हे बिर्लांचे पहिले प्रस्तावक आहेत. अमित शाह, जीतन राम मांझी, चिराग पासवानही प्रस्तावक आहेत. स्वातंत्र्यानंतरची अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची ही तिसरी वेळ आहे. थोड्याच वेळात ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीपूर्वी कुटुंबीयांनी ओम बिर्ला यांचं औक्षण केलं.























