Maharashtra Breaking 24th July LIVE Updates: मध्यरेल्वेची आठवड्याच्या सलग तिसऱ्या दिवशी रखडपट्टी सुरूच; माटुंगा स्टेशनजवळ फास्ट लोकल खोळंबल्या
Maharashtra Breaking 23rd July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
LIVE
Background
Maharashtra Breaking 24th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
1. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार आणि गिरीश महाजनांची खडाजंगी, एबीपी माझाला सूत्रांची माहिती, ग्रामविकास विभागाला वाढीव निधी मागताच अजित पवार आक्रमक
2. मार्जिन लोनमधून विरोधकांचे साखर कारखाने वगळण्यासाठी सहकार विभागाची हालचाल, संग्राम थोपटे आणि विवेक कोल्हेंचा कारखाना वगळणार असल्याची चर्चा
3. संसदेच्या दोन्ही सभागृहात आज अर्थसंकल्पावर चर्चा तर इंडिया आघाडीचं संसदेत अर्थसंकल्पाविरोधात आंदोलन
4. केंद्र सरकारकडून रेल्वेला अडीच लाख कोटींचा अभूतपूर्व निधी, 1 लाख कोटींहून अधिकचा निधी प्रवाशांच्या सुरक्षेवर खर्च करणार
5. नवीन कररचनेत 3 ते 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के टॅक्स, करात 17 हजार 500 च्या घरात फायदा, तर स्टँडर्ड डिडक्शन 50 हजारांवरून 75 हजारांवर
6. कस्टम ड्यूटी कमी केल्यानं सोन्याच्या दरात मोठी घट, मुंबईसह अनेक शहरांत सोनं 5 हजारांनी स्वस्त, चांदीच्या दरातही घसरण...
Mumbai News : मुंबईच्या दहिसर पश्चिमेत गणपत पाटील नगर मध्ये बेस्ट प्रशासनाचा बस स्टॉप गायब
Mumbai News : मुंबईच्या दहिसर पश्चिमेत गणपत पाटील नगर मध्ये बेस्ट प्रशासनाचा बस स्टॉप गायब.
बेस्ट प्रशासनाकडून शोध घेतल्यानंतर एम.एच.बी पोलीस स्टेशनमध्ये बस स्टॉप चोरीची तक्रार.
तक्रार दाखल करताच तीन दिवसानंतर पालिकेकडून बस स्टॉप काढून घेऊन गेल्याची माहिती.
बस स्टॉप काढल्यामुळे शिवसेना शिंदे गट आक्रमक. शिवसेना शिंदे गटाची मागणी बस स्टॉप काढणारा पालिका अधिकाऱ्यावर चोरीचा गुन्हा दाखल करा.
त्याचसोबत रस्त्यावर बस स्टॉप नसल्यामुळे बस कुठून पकडायचं लोकांच्या मनात असा संभ्रम निर्माण झाला आहे त्यामुळे पालिकेने तातडीने बस स्टॉप त्याच जागावर लावा असे मागणी देखील शिवसेना शिंदे गटाचे दहिसर उपविभाग प्रमुख राम यादव यांनी केली आहे.
Mamta Kulkarni: अभिनेत्री ममता कुलकर्णीला हायकोर्टाचा दिलासा
HC Quashed FIR Against Bollywood Actress Mamta Kulkarni: बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीनं गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेतील कागदपत्रं गहाळ झाल्यानं अखेर हायकोर्टानं ममता कुलकर्णीला दिलासा देऊ केलाय. साल 2016 मध्ये एनडीपीएस कायद्यानुसार ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी अभिनेत्री ममता कुलकर्णीनं मुंबई उच्च न्यायालयात साल 2018 मध्ये ही याचिका दाखल केली होती. या प्रकरणातील काही कागदपत्रं गहाळ झाल्यानं त्यावर अनेक वर्ष सुनावणी होऊ शकली नव्हती.
Khed MIDC Issue: रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये एक्सेल कंपनीतून वायू गळती
Khed MIDC Issue: मंगळवारी रात्री अचानक रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये एक्सेल कंपनीतून वायू गळती झाली. परिणामी सात ते दहा लोकांना या वायू गळतीचा त्रास होऊ लागला. या घटनेनंतर आक्रमक झालेल्या नागरिकांनी कंपनी प्रशासनाला जाब विचारत दुर्घटनेबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली. यासंदर्भात संपन्न झालेल्या बैठकीमध्ये कंपनीला लागून असलेल्या वस्तीला कायमस्वरूपी स्थलांतरित करावं आणि हा संपूर्ण विषय कायमस्वरूपी संपवून टाकावा अशी मागणी करण्यात आली. दरम्यान नागरिकांच्या काही मागण्या कंपनी प्रशासनाने मान्य केल्या असून याबाबत लवकरच तोडगा काढला जाईल असं आश्वासन एक्सेल कंपनीने नागरिकांना दिले. यावेळी झालेल्या बैठकीमध्ये पोलीस प्रशासनाच्यावतीने देखील काही अधिकारी सहभागी झाले होते. दरम्यान आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आणि भविष्यात कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास नागरिकांच्या रोषाला पूर्णपणे संबंधित कंपनी प्रशासन जबाबदार असेल असा इशारा देखील बैठकीअंति नागरिकांनी दिला आहे. सध्या बाधित झालेल्या सर्व नागरिकांची प्रकृती स्थिर आहे.
Mumbai Local Updates : मध्यरेल्वेची आठवड्याच्या सलग तिसऱ्या दिवशी रखडपट्टी सुरूच; माटुंगा स्टेशनजवळ फास्ट लोकल खोळंबल्या
Mumbai Local Updates : माटुंगा स्टेशन जवळ फास्ट लोकल थांबल्या
सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्व फास्ट लोकल थांबून
ओव्हर हेड वायर वर एक बांबू पडल्याने वाहतूक खोळंबली
हा बांबू बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू
Yavatmal Rains : यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस; नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
Yavatmal Rains : यवतमाळ जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या सतंतधार पावसामुळे नदी नाल्या काठावरील गावांना सतर्कचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. जिल्ह्यातील साडेचारशे हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले आहे. अति पाण्यामुळे सोयाबीन आणि कपाशी पिवळी पडण्याच्या मार्गावर आहे. काही शेतकऱ्यांनाचे पिके अतिपाण्यामुळे चिपडून गेली आहे. बेंबळा प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून बाबुळगाव कळम राळेगाव मालेगाव वनी या तालुक्यातील वर्धा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.