Maharashtra Breaking LIVE Updates: दोन मागण्या मान्य, आंदोलन फक्त स्थगित, अद्याप आंदोलन संपलेलं नाही- लक्ष्मण हाके
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

Background
मुंबई : सध्या राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेच्या 11 आमदारांच्या निवडणुकीचा कार्यक्रमही निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. त्यामुळे राज्यात राजकीय पक्ष जुळवाजुळवी करत आहेत. दुसरीकडे राज्यभर कुठे पावसाच्या सरी बसरत आहेत. तर कुठे अजूनही शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. या घडामोडींसह देश राज्य तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर!
दोन मागण्या मान्य, आंदोलन स्थगित अद्याप आंदोलन संपलेलं नाही- लक्ष्मण हाके
शासनाने आमच्या दोन मागण्या मान्य केलेल्या नाहीत. सगेसोयरे याबाबतचा अध्यादेश अद्याप यायचा आहे. सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत बैठक होईल. त्याशिवाय आम्ही सगेसोयरे याबाबतीत आम्ही अध्यादेश काढणार नाही. खोटे कुणबी प्रमाणपत्रे देणाऱ्यांवर तसेच घेणाऱ्यांवर कारवाई करू, असे सरकारने आश्वासन दिलं आहे. पण आम्हाला जोपर्यंत आम्हाला याबाबत श्वेतपत्रिका मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन स्थगित करण्यात आलंय. हे आंदोलन संपलेलं नाही.
Pune Police Bharti Protest : पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी केला रास्ता रोको
पुणे : पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी केला रास्ता रोको
रास्ता रोको करत विद्यार्थ्यांनी केलं आक्रमक आंदोलन
गेल्या सहा दिवसांपासून पोलीस विद्यार्थी करत आहेत आंदोलन
प्रशासनाला जाग येत नसल्याने विद्यार्थ्यांनी केला रस्ता रोको
वय वाढवून द्यावं आणि पावसाळ्यात पोलीस भारतीसाठीची मैदानी चाचणी पुढे ढकलावी यासाठी हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत























