Maharashtra News Live Updates : नाशिकमध्ये भाजपचे माजी नगरसेवक मुकेश सहाणे यांना जीवे मारण्याची धमकी
Maharashtra News Live Updates 19 September 2024 : राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर....
LIVE
Background
मुंबई : सध्या देशात तसेच राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्या दृष्टीन राज्यातील राजकीय पक्षांनी हालचाली चालू केल्या आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात सध्या बैठकांचे सत्र चालू आहे. या बैठकांत जागावाटपाची चर्चा केली जात आहे. लवकरच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाचा फॉर्म्यूला जाहीर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्यात पुन्हा एकदा पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. या प्रमुख घडामोडींसह इतरही महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर....
नाशिकमध्ये भाजपचे माजी नगरसेवक मुकेश सहाणे यांना जीवे मारण्याची धमकी
- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापलं..
-
- भाजपचे माजी नगरसेवक मुकेश सहाणे यांना जीवे मारण्याची धमकी
-
- दोन दिवसात जीवे मारण्याचा आला धमकीचा फोन
- विजय गायकवाड या नावाने आला धमकीचा फोन
-
- संशयिता विरोधात नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- उबाठा जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या सांगण्यावरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा मुकेश सहाणे यांचा आरोप
IPS अधिकारी शिवदीप लांडे यांनी भारतीय पोलीस सेवेचा दिला राजीनामा
IPS अधिकारी शिवदीप लांडे यांनी भारतीय पोलिस सेवेचा दिला राजीनामा
शिवदीप लांडे हे मध्यंतरी मुंबईत महाराष्ट्र पोलीस सेवेतही कार्यरत होते
फेसबुकवर त्यांनी आपल्या राजीनामा बाबत पोस्ट केली आहे
लांडे हे मुंबई पोलीस सेवेत अंमली पदार्थ विरोधी पथकात कार्यरत असताना ड्रग्ज तस्करांचे कंबरडे मोडले होते
तर गुन्हेशाखाचे पोलीस उपायुक्त असताना अनेक महत्वाचे गुन्हे उघडकीस आणले होते
नाशिकमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या समर्थनार्थ आंदोलन...
नाशिक ब्रेकिंग -
- नाशिकमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या समर्थनार्थ आंदोलन...
- राहुल गांधी यांच्याबाबत भाजप शिंदे गटाच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन ...
- भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहे आंदोलन ...
- नवनीत सिंग बिट्टू , अनिल बोंडे , तदविंदर सिंग ,,संजय गायकवाड यांच्या निषेधार्थ आंदोलन ...
- भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांना अटक करण्याची मागणी
- नाशिक काँग्रेस पदाधिकारी आक्रमक भूमिकेत...
हरियाणा मध्येही भाजपकडून लाडकी बहीण योजना, महिलांना दर महिन्याला 2000 रुपये दिले जाणार
हरियाणा मध्येही भाजपकडून लाडकी बहीण योजना
महिलांना दर महिन्याला 2000 रुपये दिले जाणार
अग्नीवीर युवकांना सरकारी नोकरीची गॅरंटी
50 हजार स्थानिक तरुणांना नोकरी देण्याच आश्वासन
काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या लाडकी बहीण योजना बंदच्या वक्तव्यावर कोल्हापुरात शिवसेना शिंदे गटाच्या महिला आक्रमक
काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या लाडकी बहीण योजना बंदच्या वक्तव्यावर कोल्हापुरात शिवसेना शिंदे गटाच्या महिला आक्रमक
कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांचे आंदोलन
सुनील केदार आणि राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
काँग्रेस हे लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ असल्याचे पोस्टर