Maharashtra Breaking 18th July LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
Maharashtra Breaking 18th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

Background
Maharashtra Breaking 18th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
1. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात, रेल्वे आणि रस्ते वाहतूक मंदावली, पुढील काही तास पावसाचा इशारा
2. अजित गव्हाणेंनी हाती तुतारी घेतल्यावर अजित पवार खडबडून जागे, उर्वरित पदाधिकाऱ्यांची बोलावली बैठक, नवा शहराध्यक्ष निवडण्याची शक्यता
3. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली, कोअर कमिटीची आज आणि उद्या मुंबईत बैठक, दिल्लीतून दोन्ही निवडणूक प्रभारी येणार
4. विधानसभेसाठी मुख्यमंत्र्यांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात, आजपासून बैठकांचं सत्र, मंत्री, नेते, उपनेत, शहर आणि जिल्हाप्रमुख अशा 60 जणांची बैठक
5. विधानपरिषदेतल्या क्रॉसवोटिंगवर हायकमांडचा आदेश घेऊन प्रदेशाध्यक्ष आज मुंबईत परतणार, उद्या मुंबईत काँग्रेसची महत्त्वाची बैठक
Zika Virus : एडीस डासांमुळे होणाऱ्या 'झिका' विषाणूचा पश्चिम महाराष्ट्रात वेगाने प्रसार
Zika Virus : एडीस डासांमुळे होणाऱ्या 'झिका' विषाणूचा पश्चिम महाराष्ट्रात वेगाने प्रसार होत असून रुग्णांची संख्या 28 वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने रुग्ण आढळलेल्या तीन ते पाच किलोमीटर परिसरात स्क्रीनिंग करण्यास सुरुवात केली असून संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत.
Maharashtra Politics : शिवसेनेची वर्षावर महत्त्वाची बैठक; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन
Maharashtra Politics : थोड्याच वेळात शिवसेनेची वर्षावर महत्त्वाची बैठक
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन
पक्षाची आगामी रणनीती, संपर्क अभियानाबाबत घेणार माहिती
शिवसेना पक्षाचे मंत्री, नेते, आमदार, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, प्रवक्ते वर्षा बंगल्यावर दाखल...
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत होणार बैठक
विधानसभेसाठी काही महत्त्वाच्या नेमणुका करण्यात येणार आहेत, त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता,
पक्षाची आगामी रणनीती, संपर्क अभियान बाबत घेणार माहिती..
पक्षांतर्गत वाद, नाराजी तसंच स्थानिक राजकारणाबाबत घेणार आढावा























