Maharashtra Breaking 16th July LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
Maharashtra Breaking 16th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

Background
Maharashtra Breaking 16th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
1. मुंबईसह कोकणात आजही मुसळधार पावसाचा अंदाज, रायगड, रत्नागिरीत रेड तर मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट
2. वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरांची स्थानिक पोलिसांसोबत तब्बल साडेतीन तास चर्चा, रात्री ११ ते पहाटे दोन वाजेपर्यंत चर्चा झाल्याची माहिती
3. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मागवला पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल, अंबर दिव्याचा वापर आणि आईच्या पिस्तूलबाजीचे तपशील देण्याचे आदेश
4. पूजा खेडकरांचा आणखी एक प्रताप, मेडिकलसाठी प्रवेश घेताना पूर्णत: तंदुरुस्त, वडील क्लास वन असताना मिळवला नॉन क्रिमिलेयरचा दाखला
5. विशाळगडावरील अतिक्रमणावर हातोडा, शिवप्रेमींच्या आक्रमक पवित्र्यानंतर सरकारकडून कारवाई, खासदार शाहू महाराज आज करणार विशाळगडाची पाहणी
6. विधानसभेसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी अॅक्शन मोडवर, सर्व 288 जागांचा सर्व्हे करणार, लोकसभेत सर्व्हेवर बोट ठेवणाऱ्या भाजपला अजितदादांचं उत्तर...
Thane : ठाणे करांना स्वाइन फ्लूचा धोका; रुग्णालय प्रशासन सज्ज
Thane News : ठाणे करांना स्वाइन फ्लूचा धोका, गेल्या आठवड्यात होते 70 रुग्ण, या आठवड्यात रुग्णांची संख्या 113 वर पोहोचली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय सज्ज झालं आहे. 19 खाटांची करण्यात आली आहे विशेष व्यवस्था केली असून त्यापैकी सहा बेड हे आयसीयूचे आहेत. स्वाईन फ्लूचे लक्षण आढळून आल्यास घाबरून न जाता तातडीने उपचार घ्यावेत, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
Sindhudurg News : महाराष्ट्र गोवा आंतरराज्य प्रकल्प असलेल्या तिलारी धरण ओव्हर फ्लो, उत्तर गोव्याची पाण्याची चिंता मिटली
Sindhudurg News : महाराष्ट्र गोवा आंतरराज्य प्रकल्प असलेल्या तिलारी धरण ओव्हर फ्लो, उत्तर गोव्याची पाण्याची चिंता मिटली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग मधील तिलारी धरणा ओव्हर फ्लो झालं असून सांडव्यातुन पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. धरणाच्या चारही दरवाजातून विसर्ग सुरू झाला असून 46.38 क्युमेक्स पाणी तिलारी नदी पात्रात जात आहे. धरणाची सांडवा पाणी पातळी 106.70 मीटर झाल्याने पाण्याचा विसर्ग होत आहे. तिलारी धरण ओव्हर फ्लो झाल्याने उत्तर गोव्याची पाण्याची चिंता मिटली असून धरणाचे पाणी उत्तर गोव्यातील बिचोली, पेडणे आणि बर्डेझ या तीन तालुक्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या चिंता मिटली आहे. तिलारी धरणाच्या सांडव्यातून बाहेर पडलेले हे पाणी पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीला येऊन मिळते. शिवाय तेरवण मेढे उन्नेयी बंधाऱ्यातून विसर्ग होणारे पाणीदेखील तिलारी नदीपात्रात येऊन मिळत असल्याने तिलारी नदी पात्रातील पाण्यातही कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.























