Maharashtra Breaking 12th July LIVE Updates: नवाब मलिक यांचा मेडिकल जामिन दोन आठवड्यांनी वाढवला
Maharashtra Breaking 12th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

Background
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
1. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज निवडणूक; महायुतीचे 9 तर मविआकडून 3 उमेदवार रिंगणात, कोण कोणाला शह देणार याची उत्सुकता
2. विधान परिषदेची निवडणुकीआधी सर्व पक्षांकडून मतांची जुळवाजुळव, भाजप, राष्ट्रवादी, शिंदे गट, ठाकरे गट, काँग्रेसच्या बैठका, काँग्रेसच्या बैठकीला दोन आमदारांची दांडी
3. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची 3-4 मतं फुटणार, शेकापच्या जयंत पाटलांचा दावा, काँग्रेसच्या तीन ते चार डाऊटफुल आमदारांची व्यवस्था पक्ष करेल, कैलास गोरंट्याल यांचा इशारा
4. पहिल्या पसंतीच्या मतांवर दोन्ही उमेदवार निवडून आणण्याची अजितदादांचं प्लॅनिंग, आमदारांच्या बैठकीला छगन भुजबळ गैरहजर
5. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 288 पैकी 225 पेक्षा जास्त जागा जिंकणार, शरद पवारांचा विश्वास
Yavatmal News : 20 दुचाकी जप्त; लालखेड पोलिसांची कारवाई
Yavatmal News : नांदेड, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, येथील दुचाकी चोरून यवतमाळ येथे विक्री करनाऱ्या चोरट्यांस लालखेड पोलिसांनी अटक केली. त्याच्याजवळून 10 लाख रुपये किमतीच्या 20 चोरलेल्या दुचाकीसह जप्त करण्यात आल्या. लखन देवीदास राठोड, रा. मोरगव्हाण ह.मु. सुलतानपूर, जि. बुलडाणा, वैभव घुले रा सुलतानपूर, बादल राठोड, शुभम राठोड अशी अटक करण्यात आलेल्यांची 4 आरोपींची नावे आहे.
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील 333 गावांत स्मशानभूमीच नाही
Ahmednagar News : स्मशानभूमी ही प्रत्येक गावाची मूलभूत सार्वजनिक सुविधा मानली जाते. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील 333 गावांत अद्याप स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्याने तेथे उघड्यावर किंवा मिळेल त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. तर काही ठिकाणी जागा उपलब्ध असूनही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे स्मशानभूमी नसल्याचे चित्र आहे.























