Maharashtra News Live Updates : महाविकास आघाडीच्या चर्चेत 205 जागांचं वाटप पूर्ण, 83 जागांवर दसऱ्यानंतर चर्चा
Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

Background
मुंबई : सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोणत्याही क्षणी राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते, त्यामुळे राजकीय पक्षांकडून पूर्ण ताकदीने तयारी केली जात आहे. दुसरीकडे राज्यात परतीच्या पावसाने मुंबईसह उपनगरांत हजेरी लावली आहे. मुंबईत 10 ऑक्टोबरच्या रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. आजदेखील अनेक भागांत पावसाची शक्यता आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
माढा विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले उमेदवार अभिजित पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट घेतली
माढा विधानसभा मतदार संघातून इच्छुक असलेले उमेदवार असलेले अभिजित पाटील यांनी आज शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथे भेट घेतली
अभिजित पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत महायुती सोबत काम केल आणि त्यानंतर त्यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला केंद्र सरकार कडून २८० कोटी रुपयांचं कर्ज देण्यात आल होत
पण आत्ता विधानसभेच्या निवडणुकीत अभिजित पाटील हे महाविकास आघाडी कडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत
या अगोदर पुण्यात देखील अभिजित पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती त्यामुळे अभिजित पाटील हे महायुतीची साथ सोडणार का प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे
महाविकास आघाडीच्या चर्चेत 205 जागांचं वाटप पूर्ण, 83 जागांवर दसऱ्यानंतर चर्चा
महाविकास आघाडीच्या चर्चेत २०५ जागांचं वाटप पूर्ण झाल्याची विश्वसनीय सुत्रांची माहिती
२०५ मध्ये प्रत्येक पक्षाला सुटलेल्या जागांसाठी तयारी सुरु
पक्षाच्या वाट्याला आलेल्या जागांवर प्रत्येक पक्षांची उमेदवार चाचपणी सुरु
आता उरलेल्या ८३ जागांबाबतची चर्चा दसऱ्यानंतर करणार























