(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Breaking Updates LIVE : नालासोपाऱ्यात 30 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, तिघांना 5 दिवसांची पोलीस कोठडी
Breaking News Live Updates : महाराष्ट्र, देश-विदेशातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
LIVE
Background
मुंबई : सध्या देशासह राज्यातही मोठ्या घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रात राजकीय पक्षांना सध्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. लवकरच या निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे सध्या सर्वच पक्ष या निवडणुकीची तयारी करण्यात व्यग्र आहेत. दुसरीकडे राज्यात पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सवाची धूम आहे. या प्रमुख घडामोडींसही आंतरराष्ट्रीय, देश तसेच राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर....
नाशिकच्या शिंदे गावात असलेल्या फटाक्याच्या गोडाऊनला भीषण आग
- नाशिकच्या शिंदे गावात असलेल्या फटाक्याच्या गोडाऊनला भीषण आग
- आग कशामुळे लागली कारण अस्पष्ट
- पोलीस आणि अग्निशामक विभागाच्या कर्मचारी घटनास्थळी दाखल
- आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू
- आग मोठ्या प्रमाणात असल्याने गोडाऊन मधून धुराचे लोट येत आहेत बाहेर
पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने निघालेल्या शिवशाही बसने घेतला पेट
पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने निघालेल्या शिवशाही बसने घेतला पेट
वाढे फाटा जवळ असणाऱ्या वेण्णा नदी जवळ अचानक घेतला पेट
बसमधील प्रवासी तात्काळ खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला
अग्निशामक दलाच्या वतीने आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू
पुढच्या 24 तासासाठी भंडारा व गोंदिया जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट...
पुढच्या 24 तासासाठी भंडारा व गोंदिया जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट ...
नागपूर वेधशाळेकडून देण्यात आला हा रेड अलर्ट ...
तर नागपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट ...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील 17 सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला बसणार
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या दिवशी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत. जरांगे यांनी आज माध्यमांशी बोलताना ही घोषणा केलीय. मनोज जारंगे यांनी याआधी आपण 29 सप्टेंबरला आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र आता मनोज जरांगे हे 17 सप्टेंबर पासून आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केल आहे...
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची व्यवस्थापन समिती जाहीर, वसाहेब दानवे अध्यक्ष
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची व्यवस्थापन समिती जाहीर
रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षते खाली समिती जाहीर
किरीट सोमय्या याना पुन्हा पक्षाचं काम देण्यात आलं
निवडणूक संपर्क प्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांच्याकडे जबाबदारी
तर विशेष आमंत्रित म्हणून नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, नारायण राणे, पियुष गोयल, गणेश नाईक आणि हंसराज अहिर यांच्या नावाची घोषणा