Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स; वाचा एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींसह देशभरातील इतर महत्वाचे अपडेट्स

Background
Maharashtra Breaking News Live Updates: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू याचं आज प्रयागराज कुंभमेळ्यात पवित्र स्नान आहे. संगमातील पवित्र स्नानानंतर अक्षयवट आणि हनुमान मंदिरातही दर्शन द्रौपदी मुर्मू दर्शन घेणार आहेत. तसेच दिल्लीचा मुख्यमंत्री ठरवायला वेळ लागणार अशी सूत्रांची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्यानंतरच दिल्लीचा मुख्यमंत्री ठरणार आहे. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कापूस सोयाबीन आणि तेलबिया उत्पादकांच्या बळकटीकरणासाठीच्या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. योजनेशी संबंधित काही कागदपत्रांच्या अवलोकनानंतर घोटाळा करण्याचे नियोजन काही अधिकाऱ्यांच्या मनात अनेक महिन्यांपासूनच तयार होते का, असा संशय व्यक्त केला जातोय. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींसह देशभरातील इतर महत्वाचे अपडेट्स
पोलीसच निघाले दरोडेखोर; 7 किलो सोने नागपूरच्या व्यापाऱ्याला अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उघड
Raigad Crime News: अलिबाग-पेण मार्गावर असणाऱ्या तिनविरा परीसरात काल दरोडा टाकून 7 किलो सोने लुटण्यात आले. या दरोड्यात चक्क पोलिसांनीच डल्ला मारला असुन या दरोडेखोराकडून आतापर्यंत पोलीसांनी 1 कोटी 50 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. पोलिस तपासानंतर सापडलेल्या दरोडेखोरांमध्ये आश्चर्यची बाब म्हणजे या पाच आरोपींमध्ये 3 जन हे रायगड पोलिस दलातीलच पोलिस कर्मचारी असून उर्वरित 2 आरोपी हे अलिबाग मधील असल्याची माहिती मिळाली आहे.
तब्बल सात किलो वजनाचे सोने घेऊन या दरोडेखोरांनी नागपूरच्या एका सराईत व्यापाऱ्याला हे सोने अवघ्या दीड कोटी रुपयांमध्ये विकण्याचा घाट आखला होता. मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मोठा शिताफीने या दरेदेखोरांच्या मुसक्या आवळून त्यांना पकडण्यात यश मिळवल आहे. यामध्ये चौघा आरोपींना पोलिस कोठडी देण्यात आली असून उर्वरीत एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
श्रीकांत शिंदे यांचं नवनिर्वाचित आमदारांना स्नेहभोजनाच निमंत्रण; ठाकरेंच्या आमदारांचा मोठा निर्णय!
महाराष्ट्रातील नवनिर्वाचित आमदार प्रशिक्षणासाठी दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर, राज्यातील सर्व नवनिर्वाचित आमदारांना श्रीकांत शिंदे यांचे स्नेहभोजनाचा निमंत्रण..
खासदार श्रीकांत शिंदे यांचं ठाकरेंच्या शिवसेनेतील काही नवनिर्वाचित आमदारांना स्नेहभोजनाच निमंत्रण असल्याची माहिती..
ठाकरेंच्या नवनिर्वाचित आमदारांपैकी कोणीही स्नेहभोजनासाठी जाणार नसल्याची माहिती...
दिल्लीत पोहोचलेल्या अनेक आमदारांनी आपण या स्नेहभोजनाला जाणार नसल्याचा सांगितलं आहे तर काही आमदारांनी आपल्याला निमंत्रणच आलं नसल्याचं सांगितलं आहे.....
बाबाजी काळे, वरूण सरदेसाई, गजानन लवाटे हे आपल्या मतदारसंघात असल्याकारणाने दिल्लीत नाहीत त्यामुळे काही आमदारांना या स्नेहभोजनाचा निमंत्रण मिळाले नाही.....
मात्र जे आमदार दिल्लीत प्रशिक्षणासाठी पोचले आहेत त्या आमदारांना निमंत्रण मिळाला असल्याची माहिती.....























