Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्र, देशातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर..
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्र, देशातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर..
LIVE
Background
Maharashtra Breaking News Live Updates: राज्यात सध्या मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. एकीकडे सोमनाथ सूर्यवंशींच्या आरोपींवर कारवाई न झाल्यानं आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे राज्यातील थंडीचा जोर काहीसा कमी झाला आहे. महाराष्ट्र तसेच देशातील इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Dhananjay Munde : धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या शिबिराला येणार नाहीत; नेमकं कारण काय?
धनंजय मुंडे आजच्या शिबिराला येणार नाहीत
धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाची माहिती
प्रकृती ठीक नसल्यामुळे मुंडे आज परळीत राहणार
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुंडे आणि भुजबळ उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली होती
मात्र मुंडे यांच्या कार्यालयाकडून मुंडे येणार नसल्याची माहिती दिली आहे
Pune Crime : बेकायदेशीररित्या पुण्यात राहणाऱ्या बांगलादेशीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुणे : स्वारगेट परिसरात असणाऱ्या महर्षीनगरमध्ये बांगलादेशी इसम एक वर्षापासून बेकायदेशीररित्या राहत होता. एहसान हाफिज शेख (34) असं बांगलादेशी तरुणाचं नाव आहे. या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या आरोपीकडे अनेक प्रकारची बनावट कागदपत्रे आढळली आहेत. घरझडतीत सदर इसमाकडे 7 बनावट आधार कार्ड, 7 पॅनकार्ड, 4 पासपोर्ट, पाकिस्तानी चलनी नोट, सौदी अरेबिया, कुवेत, कतार, मलेशियाचे चलन देखील मिळून आले. गेल्या एक वर्षापासून हा इसम महर्षीनगरमध्ये वास्तव्यास असून तो गारमेंटचा व्यवसाय करत होता.
Nandurbar - महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात ,मध्य प्रदेश या राज्यांमध्ये घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला नंदुरबारमध्ये अटक
Nandurbar - नंदुरबारमध्ये महाराष्ट्र आंध्र प्रदेश गुजरात मध्य प्रदेश या राज्यांमध्ये घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक
23 लाख 34 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल जप्त...
टोळीतील 6 सदस्यांना अटक नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई.....
नंदुरबार जिल्ह्यातील 4 गुन्हे उघड .....
याच टोळीने पोलीस मुख्यालय परिसरात केली होती धाडसी घरफोडी
Pune: नारायणगाव येथील अपघातातील फरार आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश
Pune: नारायणगाव येथील अपघातातील फरार आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश
स्थानिक गुन्हे शाखेने चाकण परिसरातून घेतला ताब्यात
रोहित कुमार जगमालसिंग चौधरी असे या आयशर चालकाचे नाव
हरियाणा येथे पळून जात असताना पोलिसांनी घेतला ताब्यात
पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव येथील अपघातात नऊ जणांचा मृत्यू तर सात जण गंभीर जखमी
Melghat: मेळघाटात जादूटोणाच्या संशयावरून वृद्ध महिलेची काढली धिंड
Melghat: मेळघाटात जादूटोणाच्या संशयावरून वृद्ध महिलेची काढली धिंड...
मेळघाटात रेट्याखेडा गावात जादूटोण्याच्या संशयावरून एका 77 वर्षीय आदिवासी महिलेची धिंड आणि अन्य अघोरी प्रकार केल्याचा प्रकार समोर आला आहे..
30 डिसेंबरची ही घटना असून तब्बल 18 दिवसांनी म्हणजे काल 17 तारखेला समोर आली..