Maharashtra News Live Update : विशाळगडाचा मुद्दा सपा खासदार संसदेत उपस्थित करणार
Maharashtra Breaking 19th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
विशाळगडाचा मुद्दा सपा खासदार संसदेत उपस्थित करणार
विशाळगडाचा मुद्दा सपा खासदार संसदेत उपस्थित करणार
सपाचे महाराष्ट्रातले नेते लवकरच विशालगडावर जाणार
देशात अनेक प्रश्न असताना फक्त धार्मिक राजकारण सुरू आहे
देशातील सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आम्ही बोलणार
लोकांना धार्मिक राजकारण नको म्हणून त्यांनी अयोध्येत भाजपला नाकारलं
हीच परिस्थिती महाराष्ट्र आणि देशभर
सपाच्या खासदारांची भावना
फुटलेल्या आमदारांवर होणार निलंबनाची कारवाई? काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
काँग्रेसच्या फुटलेल्या आमदारांवरती होणार कठोर कारवाई
सातही आमदारांना पक्षातून निलंबित करण्याची कारवाई होण्याची शक्यता
या सातही आमदारांवरती काय कारवाई केली याची माहिती येत्या दोन दिवसांमध्ये येणार पुढे
चंद्रकांत हांडोरे यांच्या निवडणुकीत मत फुटल्यानंतर या निवडणुकीत काँग्रेसने सावध भूमिका घेतली होती
या निवडणुकीत जे आमदार फुटलेले आहेत त्यांचे पुरावे काँग्रेसकडे असल्याची सूत्रांची माहिती
येत्या दोन दिवसात मल्लिकार्जुन खर्गे आणि के सी वेणुगोपाल या संदर्भात घोषणा करणार
पक्षाला शिस्त लावण्यासाठी काँग्रेसचे हाय कमांड करणार कठोर कारवाई
मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊन, भारतासह जगभरातील विमाने प्रभावित; काही रद्द, काही विलंबाने; बुकिंग आणि चेक-इन देखील होईना
Microsoft Faces Global Outage : मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या क्लाउड सेवेतील तांत्रिक समस्येमुळे, आज म्हणजेच शुक्रवारी (19 जुलै) भारतासह जगभरातील उड्डाणे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली. काही उड्डाणे रद्द करावी लागली तर काही उड्डाणे उशीरा झाली आहेत. मायक्रोसॉफ्टच्या Azure क्लाउड आणि मायक्रोसॉफ्ट 365 सेवांमध्ये समस्या आल्या आहेत. मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे की, "आम्हाला या समस्येची जाणीव आहे आणि आम्ही याचे निराकरण करण्यासाठी अनेक टीमना सामील केले आहे. आम्ही कारण निश्चित केले आहे. सविस्तर बातमीसाठी येथे क्लीक करा
जुन्नरमधील कल्याण नगर महामार्गावरील गुळुंचवाडी येथे भीषण अपघात, ट्रक ने तीन दुचाकी स्वरांना चिरडले
पुणे, जुन्नर : कल्याण नगर महामार्गावरील गुळुंचवाडी येथे भीषण अपघात....
भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक ने तीन दुचाकीस्वरांना चिरडले
त्याचवेळी अंत्यविधी वरून माघारी परतणाऱ्या अनेक नागरिकांनाही चिरडलं....
अपघातात काही जण दगावल्याची भीती व्यक्त केली जातीये
तर अपघातात अनेक जण जखमी...
जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात करण्यात आले दाखल....
अंत्यविधी उरकून नागरिक माघारी फिरले असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला
काही वेळापूर्वी हा अपघात झाला आहे.
काँग्रेस कमिटीच्या बैठकीत 288 जागांचा आढावा सुरू, 150 पेक्षा जास्त जागा लढवण्याचा सूर
काँग्रेस कमिटीच्या बैठकीत 288 जागांचा आढावा सुरू
काँग्रेस पक्षाकडून 288 जागेवर उमेदवार आणि जनमत याची चाचपणी करत आहे
महाविकास आघाडीसोबत चर्चेआधीच 288 मतदारसंघाचा आढावा घेऊन काँग्रेस आपला कोठा निश्चित करणार
काँग्रेस पक्षाकडून आगामी विधानसभा निवडणुकीत 150 पेक्षा जास्त जागा लढाव्यात, असा अनेक नेत्यांचा सूर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
